Type Here to Get Search Results !

नाशिकजवळ टेम्पो-मोटार अपघातात चार जणांचा मृत्यू...

 नाशिकजवळ टेम्पो-मोटार अपघातात चार जणांचा मृत्यू...


नाशिक प्रतिनिधी/वेदांगी प्रभुणे

 नाशिक :- शहरातून जाणाऱ्या मुंबई-आग्रा महामार्गावरील आडगाव शिवारात शुक्रवारी रात्री टेम्पो-मोटारीची धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला. तर दोन जण गंभीर जखमी झाले. टायर फुटल्याने भरधाव टेम्पो समोरून येणाऱ्या मोटारीवर धडकला. अपघातात मोटारीचा पूर्णत चक्काचूर झाला.

          महामार्गावरील भगवान चक्रधर स्वामी मंदिराजवळ हा अपघात झाला. खत वाहतूक करणारा टेम्पो रात्री नाशिकहून ओझरच्या दिशेने निघाला होता. टेम्पोचे टायर फुटल्याने चालकाचा ताबा सुटला आणि टेम्पो समोरून येणाऱ्या ब्रिझा मोटारीवर आदळला. त्यात मोटारीतील रहेमान तांबोळी (४८), अरबाज तांबोळी (२१, दोघे लेखानगर, सिडको) या मामा-भाच्यासह सज्जू पठाण (४०) व अक्षय जाधव (२४, दोघे इंदिरानगर) यांचा मृत्यू झाला. टेम्पो चालक बापू अहिरे आणि सहचालक सचिन म्हस्के हे गंभीर जखमी झाले आहेत. टेम्पोची धडक इतकी जबरदस्त होती की, मोटारीचा पूर्णत चक्काचूर झाला. मोटारीतील व्यक्तींना बाहेर काढणे अशक्य बनले होते. अखेर अग्निशमन दलाने मोटारीचे पत्रे कापून त्यांना बाहेर काढले.

         अपघातात मयत झालेले चौघेही नाशिकमधील रहिवासी आहेत. ते भाजीपाला व्यापारी असून कामानिमित्त बागलाणला गेले होते. तेथून परतत असताना हा अपघात झाला. मयत अरबाज तांबोळी या युवकाचा महिनाभरापूर्वीच साखरपुडा झाला होता. काही दिवसांपूर्वी त्याने मोटार घेतली होती.





जाहिरात व बातमीसाठी संपर्क/-9021816965






Post a Comment

0 Comments