वैजापूर तालुक्यातील कमलपूर बंधाऱ्यावरून लाकडांच्या गाड्यातून होते गो तस्करी...
छत्रपती संभाजीनगर/वैजापूर प्रतिनिधी:- रवींद्र पवार
वैजापूर तालुक्यातील गोदातीरी असलेल्या कमलपूर बंधाऱ्यावरून रात्री अपरात्री लाकडांची मोठमोठाली अवैध साधने रात्री लाकडाच्या आत गो तस्करी करत असल्याची खात्रीशीर माहिती वैजापूर गोरक्षक व बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना मिळालेली असून विरगाव पोलीस स्टेशन यांनी याची दखल घेऊन विनापरवाना लाकूड घेऊन जाणारी साधने यांची कसून चौकशी करावी व ती रात्री का लाकडांची वाहतूक का करतात याची विचारना व्हावी परिसरातील चांदेगाव पुलावरून देखील लाकडानी भरलेली साधने रात्री अप रात्री चालू असतात.वनाधिकारी पोलीस प्रशासन संबंधित अधिकारी यांनी याची वेळीच दाखल घ्यावी.
अन्यथा बजरंग दल व गोरक्षक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आंदोलन करतील असा देखील इशारा यावेळी देण्यात आलेला आहे.याप्रसंगी बजरंग दल व गो सेवक सुनील भाऊ घोलप सुभाष भाऊ धामणे हर्षल भाऊ रजपूत गणेश भाऊ घोडे सुनील भाऊ बारगळ ईश्वर भाऊ मोगल अतुल भाऊ आढाव दादाभाऊ भराडे रवी भाऊ पवार आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.


Post a Comment
0 Comments