कमलपूर बंधाऱ्याच्या दुरुस्तीच्या कामास प्रारंभ;ना. विखे पा.यांच्या आदेशानुसार वेगात काम सुरू जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांकडून कामाची पाहणी...
श्रीरामपूर (प्रतिनिधी)
कमलपूर येथील गोदावरी नदीवरील कोल्हापूर पध्दतीच्या बंधाऱ्याच्या दुरुस्तीच्या कामाला प्रारंभ झाला आहे.राज्याचे जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी कमलपूर बंधारा दुरुस्तीचे आदेश अधिकाऱ्यांना दिले होते. मा.सभापती दीपक पटारे यांनीही बंधारा दुरुस्तीसाठी पाठपुरावा सुरू ठेवला होता. बंधारा दुरुस्तीचे काम आता वेगात सुरू झाले आहे.दरम्यान मरणासन्न अवस्थेतील हा बंधारा दुरुस्त होत असल्याने परिसरातील गावांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
बंधारा दुरुस्तीच्या सद्या सुरू असलेल्या कामाची नुकतीच जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी करून काही सूचना केल्या आहेत.यावेळी वडाळा उपविभागीय कार्यालयाचे अभियंता संजय कल्हापुरे,सुजीत पाटिल यांच्यासह किसन मुरकुटे,दत्तात्रय शेळके,विजय दवंगे,भैरव कांगुणे,सोमनाथ भराडे,दादा पाटिल तोडमल सुभाष भराडे आदी उपस्थित होते.
साधारणपणे 5 ते 6 दिवस बंधारा दुरुस्तीचे काम सुरु राहणार आहे.यात बंधाऱ्याच्या रस्त्याचे सम्पूर्ण काँक्रीटीकरण करून संरक्षक कठड्याचीही दुरुस्ती होणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
या बंधाऱ्याची दुरुस्ती व्हावी यासाठी कमलपूर येथील भाजप कार्यकर्ते सुरवातीपासून ना. विखे पाटील यांच्याकडे आग्रही होते.6 एप्रिल रोजी सप्ताह कमिटीच्या पदाधिकाऱ्यांसमवेत ना. विखे पाटील यांची श्रीरामपूर येथील शासकीय विश्रामगृह येथे भेट घेऊन त्यासंदर्भातले निवेदनही दिले होते.यात परिसरातील काही महत्वाच्या रस्त्यांचीही तातडीने दुरुस्ती व्हावी अशी मागणी करण्यात आली होती.शनी देवगाव (ता. वैजापूर) येथे यंदाचा अखंड हरिनाम सप्ताह होऊ घातला आहे. यावेळी येणाऱ्या भाविकांची गैरसोय टाळन्याच्या दृष्टीने या बंधाऱ्याची दुरुस्ती होणे गरजेचे होते.याखेरीज या बंधाऱ्यावरून मराठवाड्यातील अनेक गावांची मोठ्या प्रमाणात वर्दळ सुरू असते. तसेच शाळा सुरू असताना परिसरातील अनेक विद्यार्थी दररोज बंधाऱ्यावरून ये-जा करत असतात.त्यांच्याही सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आलेला होता.यापूर्वी बांधर्यावरून पडून दुचाकीस्वारांचे अपघाती मृत्यू झालेले आहेत.त्यामुळे बंधारा दुरुस्तीच्या प्रश्नात जलसंपदा मंत्री ना. विखे पाटील यांनी लक्ष घालण्याचे आश्वासन भाजप कार्यकर्त्यांना दिलेले होते. त्यानुसार आता प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाल्याने ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह सभापती दीपक पटारे व कमलपूर येथील नामदार राधाकृष्ण विखे पाटील विचारमंच च्या कार्यकर्त्यांना परिसरातील शेतकरी व नागरिकांनी धन्यवाद दिले आहेत.






Post a Comment
0 Comments