श्रीरामपुरात पकडला २५ गोवंशीय जनावरांचा टेम्पो...
श्रीरामपूर/प्रतिनिधी:- रविंद्र आसने
येथील नेवासा-श्रीरामपूर रोडवर गोवंशाची वाहतूक करणारा टेम्पो येथील शहर पोलिसांनी काल पकडला. यावेळी ५ लाख २५ हजार रुपये किमतीच्या २५ गोवंश जनावरांची सुटका करण्यात आली.याबाबत सविस्तर वृत्त असे की, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या सूचना व आदेशानुसार शहर पोलीस देशमुख हे अवैध धंद्याची माहिती घेत असताना, त्यांना नेवासा फाटा-श्रीरामपूर रोडवरील वार्ड क्रमांक २ येथे एका गोवंशांची वाहतूक करणारा टेम्पो येणार असल्याची गुप्त बातमीदार मार्फत माहिती मिळाली.त्यांनी पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळंके यांच्यासह पोलीस पथक घटनास्थळाकडे स्वाना केले होते. त्यानुसार येथील शहर पोलीस स्टेशन येथे अंमलदार अशोक पाटोळे यांनी दाखल केलेल्या फिर्यादीनुसार, नेवासा फाटा-श्रीरामपुर रोडवरील बोर्ड क्रमांक २ येथे एका गोवंशांची वाहतूक करणाऱ्या टेम्पो (क्रमांक एम.एच. २० कारवाई करण्यात आली. सदर या वाहनात चालकाने अवैधरित्या २५ गोवंश जनावरे (बैल व गाय) वाहतूक करत असल्याचे माहिती दिली. ही जनावरे कत्तलीसाठी नेते असल्याची शक्यता असून, ही वाहतूक कोणतीही अधिकृत पोलीस तपासात आढळल्यावरून चालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर
पोलीस अधीक्षक वैभव कलुबमें तसेच उपविभागीय पोलीस यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे अधिकारी नितीन देशमुख यांच्या सहकार्याने पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळंके व अंमलदार यांनी केली.



Post a Comment
0 Comments