Type Here to Get Search Results !

श्रीरामपूर मध्ये उद्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची जागा बदलण्याच्या निषेधार्थ मशाल मोर्चाचे आयोजन...

 श्रीरामपूर मध्ये उद्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची जागा बदलण्याच्या निषेधार्थ मशाल मोर्चाचे आयोजन...

प्रतिनिधी/ श्रीरामपूर

        श्रीरामपूर- छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याची श्री शिवाजी चौकातील जागा बदलल्याच्या निषेधार्थ व श्री छत्रपतींचा पुतळा शिवाजी महाराज चौकातच व्हावा या मागणीसाठी उद्या दिनांक १८ जून रोजी संध्याकाळी साडेसहा वाजता मशाल मोर्चाचे आयोजन केलेले आहे तरी हिंदू समाजाने या मोर्चात मोठ्या संख्येने सहभाग द्यावा असे आवाहन हिंदू रक्षाकृती समितीचे निमंत्रक प्रकाश चित्ते यांनी केले आहे .         सदर मोर्चा रेल्वे स्टेशन हनुमान मंदिरापासून संध्याकाळी साडेसहा वाजता निघणार असून तेथेच जाहीर सभेचे आयोजन केले आहे . या मशाल मोर्चाचे नेतृत्व प्रखर हिंदुत्ववादी नेते धर्मवीर मिलिंदजी एकबोटे  आचार्य महेशजी व्यास हे करणार आहेत .

     10 मार्च 2024 श्री शिवाजी महाराज चौकात छत्रपतींच्या अश्वारूढ पुतळ्याचे सरला पिठाचे मठाधिपती रामगिरीजी महाराज यांच्या हस्ते भूमिपूजन झाले .आणि एक वर्षांनी 21 एप्रिल 2025 रोजी नामदार विखे च्या हस्ते नेहरू मार्केट भाजी मंडई मध्ये पुन्हा एकदा छत्रपतींच्या पुतळ्याचे भूमिपूजन झाले .  हा हिंदू अस्मितेचा अपमान असून हिंदू अस्मितेच्या सन्मानाकरता या मशाल मोर्चाचे आयोजन केले आहे तरी सकल हिंदू समाजाने या मोर्चात प्रतिसाद द्यावा असे आवाहन  सर्व हिंदुत्वादी संघटनांनी केली आहे .




Post a Comment

0 Comments