श्रीरामपुरात सरला बेट धामाच्या दिंडी मधील वारकऱ्यांचे चोरीस गेलेले ०३ मोबाईल ०२ तासात श्रीरामपूर शहर पोलीसांनी शोधले….
श्रीरामपुरात सरला बेट धामाच्या दिंडी मधील वारकऱ्यांचे चोरीस गेलेले ०३ मोबाईल ०२ तासात श्रीरामपूर शहर पोलीसांनी शोधले.
श्रीरामपूर/प्रतिनिधी:- रविंद्र आसने
श्रीरामपूर- आज दिनांक 22/06/2025 रोजी पहाटे 05 वा. सुमारास सरला बेट गोदावरी धाम दिंडीतील वारकरी हे आरामाकरीता स्वयंवर मंगल कार्यालय,श्रीरामपूर येथे थांबलेले असतांना कोणीतरी अज्ञात इसमाने चार्जिंग ला लावलेले ०३ मोबाईल चोरुन नेले होते. सदरबाबत पोनि. नितीन देशमुख यांना माहिती मिळताच त्यांनी तपास पथकास वारकाऱ्यांचे चोरी गेलेले मोबाईल व सदर अज्ञात चोरट्याचा शोध घेण्याचे आदेश दिले.
तपास पथकाचे प्रमुख पोसई समाधान सोळंके व सहकारी यांनी तात्काळ सदर ठिकाणी जावुन घटनास्थळाची पाहणी व तांत्रिक विश्लेन केले असता सदरचा गुन्हा हा सराईत आरोपी नामे 1) किरण जगन्नाथ चिकणे,रा. वॉर्ड नं.06, श्रीरामपूर याने केल्याचे निष्पण झाल्याने सदर आरोपीताचा त्याच्या राहत्या घरी शोध घेतला असता तो मिळुन आल्याने त्याच्याकडुन वारकऱ्याचे खालील वर्णनाचे तीन मोबाईल जप्त करण्यात आले ते पुढीलप्रमाणे-
1)10,000/- रु.कि.चा एक विवो कंपनीचा Y-16 मॉडेलचा ग्रे रंगाचा मोबाईल जुवाकिअं. (ज्योती निकम, रा. वैजापूर यांचा)
2)15,000/- रु.किं.चा एक विवो Y-29 मॉडेलचा आकाशी रंगाचा मोबाईल जुवाकिअं. (गोंविद भाऊसाहेब न्हावले रा. लाडगाव वैजापूर यांचा)
3)10,000/-रु. किं.चा. एक रिअलमी कंपनीचा rmx 1941 या मॉडेलचा मोबाईल जुवाकिंअ. (जयश्री भिमराज गायकवाड रा. वैजापूर यांचा)
40,000/- रु एकुण. किंमतीचे मोबाईल ०२ तासाच्या आत जप्त करण्यात आले.असुन नमुद आरोपीस तात्काळ ताब्यात घेण्यात आले असुन पुढील कारवाई चालू असल्याचे समजते.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे ,अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर वैभव कलुबर्मे तसेच मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, श्रीरामपूर विभाग श्रीरामपूर, डॉ. बसवराज शिवपुजे यांचे मार्गदर्शनाखाली मा. पोलीस निरीक्षक, श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन, नितीन देशमुख, यांचेकडील तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळंके, पोकों/ अमोल गायकवाड, पोका/अमोल पडोळे, पोकों/मच्छिंद्र कातखडे, पोकों/संभाजी खरात, पोका/अजित पटारे, पोकॉ/आजिनाथ आंधळे, पोकों/सांगर बनसोडे, पोका / रामेश्वर तारडे, यांनी केली असुन पुढील कायदेशीर कारवाई श्रीरामपूर शहर पोलीस करीत आहेत.



Post a Comment
0 Comments