वैजापूर येथे आनंद नगर कादरी नगर परिसरात घाणीचे साम्राज्य.
आनंद नगर,कादरी नगर परिसरात घाणीचे साम्राज्य
वैजापूर येथील काही भागात घाणीचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढले आणि त्याचा त्रास नागरिकांना मोठ्या प्रमाणावर सहन करावा लागत आहे. वैजापूर शहरातील आनंद नगर,कादरी नगर व अंगणवाडी परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा झाला असल्यामुळे नागरिकांना मच्छराचा देखील सामना करावा लागत आहे.
राष्ट्रीय मानवाधिकार असोशियन महाराष्ट्र प्रदेश महासचिव यांच्या वतीने नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना निवेदन द्याण्यात आले.
मच्छरामुळे आजारपणाचे लक्षण असल्यामुळे राष्ट्रीय मानवाधिकार असोशियन महाराष्ट्र प्रदेश महासचिव यांच्या वतीने आज नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना साफसफाई मच्छर फवारणी करावी यासाठी निवेदन देण्यात आले. निवेदन कर्ते, आकाश शिंदे विजय बाबा त्रिभुवन महेश भालेराव पोपटराव गोळे दीपक बनकर आदी उपस्थित होते...



Post a Comment
0 Comments