Type Here to Get Search Results !

*चोख पोलिस बंदोबस्तात श्रीरामपुर वॉर्ड क्रमांक २ येथे जय बजरंग तरुण मंडळाच्या वतीने भव्य मिरवणुकीसह हनुमान जन्मोत्सव उत्साहात साजरा*

                                          झेंडा मिरवणूक


श्रीरामपूर /प्रतिनिधी

           सालाबाद प्रमाणे वॉर्ड क्रमांक २,येथे २३ एप्रिल २०२४ रोजी बजरंग चौक, अहिल्यादेवी नगर येथे हनुमान जन्मोत्सव अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. पहाटे ६ वाजता हनुमान जन्मपुजा संपन्न झाली यावेळी भव्य आतिषबाजी करण्यात आली. सकाळी १० वाजता वॉर्ड क्रमांक २ परिसरात हनुमान महाराज प्रतिमा व झेंडा मिरवणूक काढण्यात आली. डिजे च्या तालावर यावेळी हनुमान भक्तांनी व बाल गोपाळांनी ठेका धरला. मिरवणूक संपन्न झाल्यावर दुपारी १२ वाजता भव्य महाप्रसाद वाटप करण्यात आला. यावेळी १००० ते १२०० भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. यावेळी मशीद परिसरात शांतता राखून मिरवणूक पार पाडल्याबद्दल वंचितचे बाबाभाई शेख यांनी जय बजरंग तरुण मंडळाचे अध्यक्ष श्री. मनोज संजय बागुल यांचा सत्कार केला.

          या कार्यक्रमाला महायुतीचे चेतन सदाशिव लोखंडे, भाजपा प्रवक्ते नितीन दिनकर, मर्चंट असोसिएशनचे गौतम उपाध्ये, रिपाई कवाडे गटाचे संतोष मोकळ, आरोग्यमित्र सुभाषराव गायकवाड, महावितरणचे सहाय्यक अभियंता आहेर साहेब, वेताळ साहेब, सुभाष माळी, काँग्रेस पक्षाचे रियाजखान पठाण, वंचितचे बाबाभाई शेख, प्रहार जनशक्तीचे सुमित रहिले, लहुजी शक्ती सेनेचे लहू खंडागळे उपस्थित होते.

          कार्यक्रमाला ना. राधाकृष्णजी विखेपाटील साहेब, राष्ट्रीय श्रीराम संघ, बजरंग सेवा संघ, ॲड. भारस्कर, डी वाय एस पी शिवपुंजे साहेब, श्रीरामपुर शहर पोलिस निरीक्षक देशमुख साहेब, पोलिस उपनिरीक्षक सोळुंके साहेब यांचे विशेष सहकार्य व मा. उपनगराध्यक्ष अंजुमभाई शेख, मंडळाचे माजी पदाधिकारी प्रकाशदादा खोले, सुरेश शिंदे, फिरोज मुलानी, मार्गेश शिंदे, नारायण बन्सी, विजय खाडे, ओमशेठ चुग, अरूणमामा जोजारे, हृषिकेश खोले, विजय गोडसे, विशाल गोडसे, दशरथ रहिले, संतोष डावरे, राजू शिंदे, सुनील हातागळे, बाळासाहेब गोसावी, सुरेश लाहुंडे, मनोज हासे, बाळासाहेब हासे यांचे मार्गदर्शन लाभले.

          कार्यक्रम यशस्वीतेसाठी मंडळाचे अध्यक्ष मनोज बागुल, उपाध्यक्ष चंद्रकांत बन्सी, सचिव राहुल उमाप, खजिनदार महेश शिंदे, सह सचिव कुणाल पाभारे तसेच पवण पावसे, राजुभाऊ धिवर, विकास जाधव, अक्षय चिंतामणी, किरण रहिले, अक्षय शिंदे, बाळासाहेब जगताप, हृषिकेश परदेशी, नयन तरकासे, कमलेश शिंदे, रवी वायदंडे, जगन्नाथ रणनवरे, राहुल ठोकळ, उमेश फाजगे, पप्पू सौदागर, काळू भालेराव, लखन वैरागर, सोनु सौदागर, लक्ष्मण बोऱ्हाडे, कृष्णा वायदंडे, सुनील पेटारे, सुनील गालफाडे, आत्माराम सोनवणे, दिपक भारस्कर, रवी लाहुंडे, विशाल गोल्हार, मोहित खोले, निलेश त्रिभुवन, जयेश रहिले, जयेश शिवले, हर्षल जगताप, सोनु चौहान, विवेक शिवले, विशाल शिवले, किरण बन्सी, सुरेश छल्ले, गौतम साळुंके, विनोद वाडेकर, ज्ञानेश्वर हासे, परशुराम अस्वर, हेमंत जगताप, गणेश जगताप, शाहरुख शेख, शाहरुख पठाण, दत्तु जाधव, राम भालेराव, ओम जाधव, आदित्य काकडे, महेश जाधव, विशाल बागुल, योगेश बागुल, उदय रहिले, बाळा रहिले, अजय शिंदे, उदय शिंदे, दीपक लोखंडे, दीपक शिंदे, विजय लोखंडे, विजय शिंदे, सुजल शिंदे, उद्देश शिंदे, चेतन शिंदे, अनिल लोखंडे, संजय शिंदे, कृष्णा शिंदे, नितीन शिंदे, रोहित लोखंडे, अक्षय लोखंडे, रोशन शिंदे, सागर शिंदे, प्रज्वल धामोणे, रोहन मालपुरे, कुणाल धामोणे, सिद्धेश धामोणे, चैतन्य गोडसे, अक्षय धामोणे यांनी सहकार्य केले.

Post a Comment

0 Comments