श्रीरामपूर / (प्रतिनिधी):-
हिंदू एकता आंदोलन पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुदर्शन शितोळे यांनी नगर दक्षिणमधून आपला उमेदवारी अर्ज दाखला केला.
हिंदू एकता आंदोलन पक्ष ही सुरुवातीला एक संघटना होती. स्थापनेपासून हिंदूंच्या विविध प्रश्नांसाठी त्यांनी आवाज उठविला. ३७० वे कलम रद्द करणे, अयोध्ये राम मंदिर बांधणे, समान नागरी कायदा करणे आदींसह शेतकरी व कामगार हिताच्या प्रश्नांना त्यांनी वाचा फोडली होती. या संघटनेचे रुपांतर पुढे वाढत जावून पक्षात झाले. आज पक्षाच्या जिल्ह्यात १५५ शाखा असून हजारो कार्यकर्ते असल्याचे शितोळे यांनी सांगितले. शिवसेने हिंदुत्व सोडले आहे तर भाजपचे हिंदुत्व संपलेले असून आता हिंदू एकता आंदोलन पक्षाकडेच खरे हिंदुत्व राहिल्याची जाणीव जनतेला झाली असून १८ ते २२ वर्षे वयोगटातील युवक वर्ग हिंदू एकता आंदोलन पक्षाला मतदान करतील असा विश्वास व्यक्त होत आहे. दक्षिण नगर मतदारसंघातील कर्जत, जामखेड, पाथर्डी, श्रीगोंदा तालुक्यातील हजारो कार्यकर्त्यांनी पक्षाचे उमेदवार सुदर्शन आण्णा शितोळे यांच्यासाठी अहोरात्र काम करणार असल्याचे सांगितले असून त्यांना निवडून आणण्याचे काम जनताच करणार असल्याचे यावेळी कार्यकर्त्यांनी सांगितले.दिसत असल्याने गेली ३५ वर्षे महाराष्ट्रात पक्षाची बांधणी करून १२ जिल्हे व ४५ तालुक्यामध्ये या पक्षाची ताकद आहे. दोन दिवसांपूर्वी नगर, जामखेड, श्रीगोंदा, कर्जत आणि पारनेर या मतदारसंघातून शितोळे यांनी दौरा केला असून त्यांना मोठा पाठिंबा दिसून येत आहे. यामुळे ही लढत आता बहुरंगी होणार असून जनतेचे या लढतीकडे लक्ष लागले आहे. या बैठकीस संपूर्ण नगर जिल्ह्यातून पदाधिकार व कार्यकर्ते उपस्थित होते. नगर तालुकाप्रमुख विलास लष्करे, कार्याध्यक्ष चिलिया तुवर, नगर शहरप्रमुख राजेंद्र पारधे, जिल्हा संपर्कप्रमुख अमीर जहागिरदार, मुकुंदनगर शाखाप्रमुख नजीर इनामदार, बी.एम.पवार व अन्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हिंदु एकता आंदोलन पक्षाकडून प्रदेशाध्यक्ष सुदर्शन आण्णा शितोळे उमेदवारी अर्ज दाखल करताना.समवेत चिलीया तुवर, आमिरभाई जागिहदार, बी.एम. पवार, मंगेश छतवाणी, बाळासाहेब जाधव आदी.
- गुरुमाऊली ऑनलाईन (सेतू कार्यालय) श्रीरामपूर संपर्क:-9021816965


Post a Comment
0 Comments