महाराष्ट्र न्यूज 24 तास :- राज्य उत्पादन शुल्कच्या श्रीरामपूर सहाय्यक दुय्यम निरीक्षक खलील शेख लाच घेताना रंगेहात लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात...
श्रीरामपूर (प्रतिनिधी)
शासनमान्य देशी दारू विक्रेते यांचा व्यवसाय सुरळीत चालू देण्यासाठी व त्यांचे बिअर बार परमिट रूमवर कायदेशीर कार्यवाही न करण्याच्या मोबदल्यात राज्य उत्पादन शुल्कच्या श्रीरामपूर भरारी पथकातील सहाय्यक दुय्यम निरीक्षक खलील खुर्चीत शेख (वय ४०, रा. खडकी रोड, चर्चेच्या समोर, कोपरगाव) याला ११ हजाराची लाच घेताना नुकतेच रंगेहात पकडले.
नाशिक लाच लुचपतविभागाच्या पोलीस निरीक्षक गायत्री मधुकर जाधव व त्यांच्या पथकाने काल सदरची कारवाई केली. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे शासनमान्य देशी दारू विक्रेते असून त्यांचा व्यवसाय सुरळीत चालू देण्यासाठी व त्यांचे बियर बार परमिट रूमवर कायदेशीर कार्यवाही न करण्याच्या मोबदल्यात सहाय्यक दुय्यम निरीक्षक खलील खुर्चीत शेख यांनी पंचसमक्ष ११ हजार रुपयांची मागणी करून लाच घेताना रंगेहात पकडले.
तुळसकर निवास जवळ शिंगणापूर येथे ही कारवाई करण्यात आली असल्याचे पोलीस निरीक्षक गायत्री जाधव यांनी सांगितले. कोपरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या नाशिक विभागाच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक व तपास अधिकारी गायत्री जाधव तसेच सापळा पथकातील पोलीस हवालदार संदीप वनवे, पोलीस हवालदार ज्योती शार्दुल यांनी ही कारवाई केली.

Post a Comment
0 Comments