नागमठाण येथील भव्य बाल संस्कार शिबीर आनंदात संपन्न....
नागमठाण येथील बालाजी मंदिर संस्थानच्या वतीने मठाधिपती स्वामी ज्ञानानंदगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाने व ह.भ.प.रामदास बाबा यांच्या कृपा आशीर्वादाने आनंदायी वातावरणात व निसर्गाच्या सान्निध्यात बालाजी मंदिर (कुटिया) अव्वलगाव रोड येथे अकरा दिवसीय भव्य बाल संस्कार शिबीराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरात शहरी व ग्रामीण भागातील चाळीस विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.या विद्यार्थ्यांना नित्य नियम योगा प्राणायाम गीता पाठ हनुमान चालीसा हरिपाठ बरोबरच संस्काराविषयक व आरोग्य विषयक ज्ञान देण्यात आले.
बाल संस्कार शिबीर समाप्ती वेळी अनेक विद्यार्थ्यांनी कुतूहलाने आपले मनोगत व्यक्त केले.आजच्या काळात मुलांना शालेय शिक्षणाबरोबच बाल संस्कारअत्यंत गरजेचे असुन प्रत्येक वर्षी यांचे आयोजन करणार असे मत महंत स्वामीजी यांनी व्यक्त केले शिबीर सांगता वेळी प्रमुख उपस्थिती बालाजी मंदीराचे महंत स्वामी ज्ञानानंदगिरी सटाणा येथील दोधेश्वर महादेव मंदिराचे मठाधिपती महंत श्री स्वामी हरिओम आनंद पुरी जी महाराज आर्ट् ऑफ लिव्हींगचे योग शिक्षक पाटणी सर गुरुवर्य शिंदे सर नागमठाणचे सरपंच बबन नाना गायके ज्ञानेश्वर तांबे महाराज मंदिराचे सेवेकरी रामगिरी बाबा बरोबरच शिबिरातील विद्यार्थ्यांचे माता पालक उपस्थित होते. शिबीर यशस्वीतेसाठी हभप दादा महाराज खर्डे , हभप ध्रुव महाराज, नागेश्वर इंग्लिश स्कूलचे संस्थापक प्रा.प्रमोद विश्वंभर सर केशव गवळी, इंद्रभान तागड,आदींनी परिश्रम घेतले.
गुरुमाऊली ऑनलाइन सर्विसेस सेतू कार्यालय नवीन तहसील कार्यालय समोर श्रीरामपूर संपर्क:-9021816965,8799908023


Post a Comment
0 Comments