महाराष्ट्र न्यूज 24 तास :- श्री श्री १००८ महामंडलेश्वर स्वामी शांतीगिरीजी महाराजांच्या उपस्थिती श्री क्षेत्र काशी येथे २८ मे पासून जपानुष्ठान सोहळा...
श्रीरामपुर : प्रतिनिधी /कृष्णा लांडे
जय बाबाजी भक्त परिवाराच्या वतीने अध्यात्मिक राजधानी असलेल्या श्रीक्षेत्र काशी येथील आश्रमात २८ मे पासून धर्म सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. आठवडाभर चालणाऱ्या या सोहळ्यात मौनव्रत, उपवास करत जपानुष्ठान, यज्ञ, अखंड नंदादीप आदी विविध साधना करण्यात येणार असून याबरोबरच श्रमेव जयते.. अर्थातच 'कामात राम' अशी दिव्य शिकवण देणारी श्रमदान परंपराही प्रभावीपणे जोपासली जाणार असल्याची माहिती जय बाबाजी भक्त परिवाराच्या वतीने देण्यात आली. निष्काम कर्मयोगी जगदगुरू जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराजांचे उत्तराधिकारी अनंत विभूषित महामंडलेश्वर स्वामी शांतीगिरीजी महाराज यांच्या प्रेरणेने आणि प्रमुख उपस्थितीत जय बाबाजी भक्त परिवाराच्या वतीने २८ मे ते ४ जून दरम्यान महाजपानुष्ठान सोहळ्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. मौनव्रतात आणि उपवास करत या कालावधीत जप साधना करण्यात येणार आहे. भक्त परिवाराच्या वतीने प्रत्येक वर्षी काशी येथील डोमरी ग्राम परिसरातील जगदगुरु जनार्दन स्वामी महाराज आश्रमात जपानुष्ठान सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. यावेळी जपानुष्ठान बरोबरच यज्ञ, अखंड नंदादीप, श्रमदान, हस्त लिखित नाम जप, गंगा पूजन, गो-ब्राम्हण-संत पूजन तसेच रोज ब्रम्हा मुहूर्तावर पहाटे ठीक ५ वाजता अमृततुल्य नित्य नियम विधी, आरती, सत्संग, प्रवचन, प्राणायाम, श्री सार्थ एकनाथी भागवत वाचन यांसह विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. भाविकांनी काशी या पुण्यनगरीत होणाऱ्या सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आवाहन जय बाबाजी भक्त परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.
गुरुमाऊली ऑनलाईन सर्व्हिसेस सेतु कार्यालय नवीन तहसील कार्यालयासमोर श्रीरामपूर संपर्क:-9021816965




Post a Comment
0 Comments