महाराष्ट्र न्यूज24तास :- श्रीक्षेत्र बाजाठाण येथील राम दरबार आश्रम मध्ये त्रि दिनियअखंड राम नाम जप सुरू...
राम दरबारत्रि दिनियअखंड राम नाम जप सुरू
छत्रपती संभाजीनगर/वैजापूर प्रतिनिधी:- रवींद्र पवार
श्रीक्षेत्र राम दरबार आश्रम बाजाठाण या ठिकाणी सुरू असलेला त्रि दिनियअखंड राम नाम जप सुरू असून राम दरबारचे मठाधिपती ह.भ.प. प्रेम मूर्ती हरीशरण गिरीजी महाराज यांच्या अधिपत्याखाती सुरू असलेले प्रभू रामचंद्राचे नित्य स्मरण परिसराला आनंदाची वेगळीच प्रचिती देते श्रीक्षेत्र सरला बेटाचे महंत ह.भ.प. रामगिरीजी महाराज तसेच श्रीक्षेत्र देवगड संस्थांनचे महंत ह.भ.प.प्रकाश नंदगिरीजी महाराज तसेच शिवगिरी आश्रमाचे मठाधिपती ह.भ.प.संदिपानजी महाराज यांच्या आशीर्वादाने राम दरबार आश्रमामध्ये दर एकादशीला होणारे फल आहार कीर्तन,भजन,काकड,आरती तरुणांना लागलेली नामस कीर्तनाची ओढ माता भगिनींची सेवा ही एक राम दरबारची वेगळी ओळख असून नाशिक,अहिल्या देवीनगर , छत्रपती संभाजीनगर या परिसरातून भाविक मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी येतात.राम लल्लाची प्रति आयोध्या याच ठिकाणी दिसून येते याची डोळा याच देही याची प्रचिती या ठिकाणी बघायला मिळते.राम दरबारचे मठाधिपती ह.भ.प.प्रेम मूर्ती हरीशरण गिरीजी महाराज यांच्यात भक्तांना साक्षात हनुमंत रायाचे प्रतिक दिसून येते महाराजांच्या चेहऱ्यावरील तेज नित्यसेवा अखंड राम नाम जप पंचक्रोशीला गंगा गोदावरी मातेच्या आशीर्वादाने या भागवतमय नामस्मरणात एक वेगळीच भर घालते अखंड साधूंचा सहवास लाभलेला आश्रम पहाटे काकड्याची ती मंजुळ ध्वनी कानी पडते आणि पंचक्रोशीतील भक्तजन मंत्रमुग्ध होऊन देहभान विसरतात प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या या पावन नगरीत राम दरबारचे महंत यांच्या रूपाने प्रभू रामचंद्र यांनी दिलेले एक अनमोल रत्न प्रेम मूर्ती हरीशरण गिरीजी महाराजांच्या रूपाने परिसराला लाभलेले असून महाराज भक्तांवर अतोनात प्रेम करतात.परिसरातील बाजाठाण,भामाठाण,आवलगाव,देवगाव शनी,चेंडूफळ,हमरापूर,गाढे पिंपळगाव,माळीघोगरगाव,नेवरगाव,कमलपूर,नागमठाण,वैजापूर,गंगापूर,श्रीरामपूर,नेवासा,आधी करून भावी भक्त कार्यक्रमाचा आनंद घेतात अन्नदान करतात,श्रमदान करतात आणि आश्रमासाठी आर्थिकही मदत परिसरातील तसेच बाहेरून आलेले भक्तांचे असते महाराजांनी सुरू केलेले.
गुरुमाऊली ऑनलाईन सर्व्हिसेस सेतू कार्यालय नवीन तहसील कार्यालय समोर श्रीरामपुर संपर्क.9021816965,8799908023



Post a Comment
0 Comments