Type Here to Get Search Results !

महाराष्ट्र न्यूज 24 तास:-पाणी प्रश्नासाठी शेतकर्‍यांचे पाटबंधारे विभागाच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन.....

 महाराष्ट्र न्यूज 24 तास:-पाणी प्रश्नासाठी शेतकर्‍यांचे पाटबंधारे विभागाच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन....


श्रीरामपूर /प्रतिनिधी:-रवींद्र आसने 

श्रीरामपूर - भंडारदरा धरणाच्या शेतीसाठी सोडण्यात आलेल्या आवर्तनातून भरणे राहिलेल्या संतप्त शेतकऱ्यांनी आज आमदार लहू कानडे यांच्या मार्गदर्शनाखाली व माजी नगरसेवक अशोक (नाना) कानडे यांच्या नेतृत्वाखाली पाटबंधारे विभागाच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. राहिलेले भरणे काढण्याचा तसेच पिण्याच्या पाण्यासाठी गावतळी भरून देण्याचे सांगितल्याने संबंधित अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.

     भंडारदरा धरणातून सध्या शेतीसाठी आवर्जून सोडण्यात आले आहे. या आवर्तनात अत्यंत कमी दाबाने चाऱ्यांना पाणी सोडण्यात आल्याने अनेक शेतकऱ्यांचे भरणे राहिल्याच्या तक्रारी तसेच वरून धरणाचे पाणी बंद झाल्यामुळे आता काय होईल, या प्रश्नामुळे शेतकऱ्यांनी आमदार लहू कानडे यांच्याकडे तक्रारी केल्या. त्यानंतर आ. कानडे यांनी पाटबंधारे विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना पत्र पाठवून अधिक दाबाने पाणी सोडण्याबाबत सूचना केल्या होत्या. त्यानंतरही अनेक शेतकऱ्यांचे भरणे राहिल्याचे तसेच आवर्तन बंद होत असल्याचे समजल्याने आज माजी नगरसेवक अशोक (नाना) कानडे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभागाच्या कार्यालयावर जाऊन धरणे आंदोलन केले.

     आवर्तन सोडल्यानंतर नियोजनाचा अभाव असल्याने पाण्याची वितरण व्यवस्था कोलमडली. अनेक शेतकऱ्यांची भरणे राहिली. श्रीरामपूर तालुक्यातील सुमारे 300 हेक्टर क्षेत्र भरण्यापासून वंचित राहिले. अधिकाऱ्यांनी वस्तुस्थिती झाकून ठेवल्याने पाण्याची खरी आकडेवारी बाहेर आली नाही. कमी दाबाने पाणी मिळाल्याने शेतकरी पाण्यापासून वंचित राहिले. या आवर्तनातून संपूर्ण शेतकऱ्यांचे भरणे काढून द्यावे तसेच पिण्याच्या पाण्यासाठी असलेल्या योजनांचे गावतळे तातडीने भरून द्यावे अशी मागणी करत त्याशिवाय शेतकरी येथून हलणार नाहीत, अशी भूमिका अशोक (नाना) कानडे व शेतकऱ्यांनी घेतली त्यामुळे अधिकाऱ्यांची चांगलीच अडचण झाली.

       पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता स्वप्निल काळे व वडाळा उपविभागाचे उपअभियंता श्री. कल्हापुरे नगर येथे बैठकीस असल्याने येथील अधिकारी श्रीमती कुऱ्हाडे यांनी श्री. काळे व कल्हापुरे यांच्याशी संपर्क साधत आंदोलनाची माहिती दिली. त्यांनी श्री. कानडे व शेतकऱ्यांशी दूरध्वनीवरून संवाद साधत, धरण जरी बंद झाले असले तरी आपल्या तक्रारी मी समजून घेतल्या असून पूर्ण क्षमतेने डी वाय 15 व त्यावरील भरण्याचे नियोजन करत असून खोकर, मातापुर आदि गावातील भरणे राहणार नाहीत, असे सांगितले, तसेच डी वाय 3 वर ज्यांच्या कामामुळे हा प्रश्न निर्माण झाला ते कालवा निरीक्षक श्री. अडसुरे यांना तातडीने निलंबनाची कारवाई करत असून त्या ठिकाणी श्री. सय्यद यांची नेमणूक देत आहे तसेच माळवाडगाव, मुठेवाडगाव, वडाळा महादेव येथील शेतकऱ्यांचे भरणे व पिण्याच्या पाण्याची सोय केली जाईल, असे सांगितले. संपूर्ण भरणे काढण्याचे तसेच गाव तळे भरून देण्याचे सांगितल्याने आंदोलन स्थगित करण्यात येऊन भरणे राहिल्यास शेतकरी पुन्हा यापेक्षाही तीव्र आंदोलन करतील, असा इशारा श्री. कानडे यांनी यावेळी दिला.यावेळी डॉ. नितीन आसने, हरिभाऊ बनसोडे, सुरेश पवार, सरपंच सागर मुठे, अजिंक्य उंडे, राजेंद्र औताडे, रमेश आव्हाड,संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष शिवाजी पवार, निखिल कांबळे, श्याम आसने, शरद जासूद,गणेश गोसावी, रवींद्र मुठे, संभाजी बनसोडे, दत्तात्रय मुठे, संतोष मुठे, बाबासाहेब कासार, बापूसाहेब आढाव, नितीन उंडे यांच्यासह सुमारे 300 हून अधिक शेतकरी आंदोलनात सहभागी झाले होते.





महाराष्ट्र न्यूज 24 तास

जाहिरात व बातमीसाठी संपर्क:-9021816965

Post a Comment

0 Comments