Type Here to Get Search Results !

निवृत्ती महाराजांच्या दिंडीच्या स्वागतासाठी श्रीरामपूरकर सज्य..

निवृत्ती महाराजांच्या दिंडीच्या स्वागतासाठी श्रीरामपूरकर सज्य..



श्रीरामपूर / प्रतिनिधी

    श्रीक्षेत्र त्रंबकेश्वर येथील संत श्रेष्ठ निवृत्ती महाराज संस्थानच्या वतीने आषाढी एकादशीस पंढरपूरला जाणाऱ्या निवृत्तीनाथांच्या दिंडीचे शनिवार दि. २९ जून रोजी दुपारी १२.३० वाजता श्रीरामपूर नगरीत आगमन होणार आहे.

     संगमनेर रस्त्यावरील जुन्या जकात नाक्याजवळ मान्यवरांच्या उपस्थितीत पालखीचे स्वागत करण्यात येणार आहे. दिंडीचे नेतृत्व पालखीचे मानकरी जयंत महाराज गोसावी, बाळकृष्ण महाराज डावरे, मोहन महाराजबेलापूरकर, बाळासाहेब देहुकर, महामंडलेश्वर, रामकृष्ण महाराज लहवीतकर, सुरेश महाराज गोसावी, अध्यक्ष त्र्यंबकराव गायकवाड व मंदिराचे विश्वस्त करत आहेत.

       पालखीच्या स्वागतासाठी खा.भाऊसाहेब वाकचौरे, आमदार लहू कानडे, माजी माजी आमदार भानुदास मुरकुटे, आ.भाऊसाहेब कांबळे, माजी नगराध्यक्षा अनुराधा आदिक, माजी उपनगराध्यक्ष करण ससाणे, सिध्दार्थ मुरकुटे, माजी नगराध्यक्ष अनिल कांबळे, संजय फंड,प्रातांधिकारी किरण सावंत पाटील, तहसिलदार मिलिंद वाघ, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलबुमें, बाजार समितीचे सभापती सुधीर नवले, सचिन गुजर, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष मुकेश कोठारी, उपाध्यक्ष बाळासाहेब खाबिया, सचिव निलेश बोरावके, रमेश कोठारी, नगरसेवक, मुख्याधिकारी सोमनाथ जाधव, राजकीय पक्षाचे प्रमुख, माजी नगरसेवक स्वागतासाठी उपस्थित राहणार आहेत. पालखीची शोभायात्रासंगमनेर रोड, गांधीपुतळा चौक मेनरोड मार्गे राममंदिरात येईल. येथे श्रीराम मंदिराच्या अध्यक्षा प्रणिती गिरमे, उपाध्ये परिवार, हमाल, मापाडी, व्यापारी व शेतकरी आर्दीच्या हस्ते पालखीचे पूजन करण्यात येईल. त्यानंतर भंडाऱ्याचा कार्यक्रम पार पडणार आहे.

      पालखीच्या स्वागतासाठी भाविकांनी, वारकऱ्यांनी नागरिकांनी, भजनीमंडळ व महिला भजनी मंडळ आदींनी उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.




Post a Comment

0 Comments