*श्रीगोंदा तालुक्यातील गौण खनिज पथकावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याच्या निषेधार्थ श्रीरामपुरात कामबंद आंदोलन...*
श्रीरामपुर/प्रतिनिधी मयुर फिंपाळे
श्रीरामपूर - श्रीगोंदा तालुक्यातील गौण खनिज पथकावर झालेल्या जीवघेण्या हल्या बाबत श्रीरामपूरात कामबंद आंदोलन दिनांक 26 जून सुरू आहे आज आंदोलनाचा तिसरा दिवस आहे. श्रीगोंदा तालुक्यातील चवर सांगवी गावात अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाही साठी गेलेल्या महसूल कर्मचारी पथकावर जीव घेणा हल्ला करण्यात आला जवळ 12 ते 14 इसमांनी हल्ला केल्याची माहिती आहे. या हल्ल्यात महसूल चे सहा कामगार तलाठी कर्मचारी व तीन मंडळ अधिकारी जखमी झाले आहेत. ह्या सर्व फरार असलेल्या 12 ते 14 इसमांना लवकरात लवकर अटक होऊन त्यांच्या वर कडक कारवाई करावी अशी मागणी करत श्रीरामपूर तालुका कामगार तलाठी व कर्मचारी बेमुदत काम बंद आंदोलन करत आहे.
या वेळी तलाठी संघटना जिल्हा उपाध्यक्ष बाबसाहेब कदम, श्रीरामपूर महसूल कर्मचारी संघटना तालुका अध्यक्ष महेश खरपूडे, धनवटे,वाघ मॅडम, तलाठी संघटनेचे अध्यक्ष राजेश घोरपडे, मंडळाधिकारी, मंडलिक, तलाठी, सोनवणे सूर्यवंशी, दरेकर, श्रीनाथ, कदम, पुंड, चितळकर,कदम,शिंदे, तेलतुंबडे माटे, भडकवाल,इमानदार,पवार,्मचारी संपात सहभागी झाले आहे.




.png)
Post a Comment
0 Comments