Type Here to Get Search Results !

अशोक नगर येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी...

 अशोक नगर येथे  लोकशाहीर अण्णाभाऊ साठे  यांची जयंती  साजरी...


 श्रीरामपुर/प्रतिनिधी

           श्रीरामपूर तालुक्यातील अशोकनगर येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.मान्यवरांच्या हस्ते  प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.प्रसंगी अण्णाभाऊ साठे यांच्या नावाचा जयघोष करण्यात आला.येथील कॅनालच्या कडेला असलेल्या भागचंद  नवगिरे यांच्या निवासस्थानी अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. प्रसंगी श्रीरामपूर वकील बार असोसिएशनचे श्री.अरुण जंजिरे  यांच्या शुभहस्ते  अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला.  प्रमुख उपस्थिती निपाणी वडगाव ग्रामपंचायत सदस्य  मुरलीधर राऊत  तसेच मोठ्या संख्येने मान्यवर उपस्थित होते.मा राजेश घोरपडे महसुल अधिकारी ग्रामपंचायतचे उपसरपंच विलास जाधव व  सामाजिक कार्यकर्ते अजित राऊत ग्रा सदस्य अक्षय राऊत यांनी मनोगत व्यक्त करत अण्णाभाऊ साठे यांचेजीवन चरित्र व्यतीत केले. प्रसंगी मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते श्री भागचंद नवगिरे यांनी आभार मानले.

Post a Comment

0 Comments