'स्वीप' अंतर्गत मतदान नोंदणी उपक्रम; तृतीयपंथीयांनी घेतली १०० टक्के मतदानाची शपथ.
प्रतिनिधी/श्रीरामपूर
श्रीरामपूर : विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. याकामी मतदार यादी तयार करण्याचे काम निवडणूक विभागाकडून अंतिम टप्प्यात आहे. त्याचाच एक भाग म्हणून 'स्वीप' अंतर्गत श्रीरामपूर येथील तृतीयपंथी समाज सेवा संस्थेत विशेष मतदार नोंदणी अभियान राबविण्यात आले. यावेळी प्रांताधिकारी किरण सावंत पाटील यांनी तृतीयपंथी मतदारांना मतदार यादीत नाव नोंदवण्याचे व येत्या विधानसभा निवडणुकीत १०० टक्के मताधिकार बजावण्याचे आवाहन केले. याप्रसंगी तृतीयपंथी नवमतदारांना नैतिक मतदानाची शपथ देण्यात आली.
यावेळी १६ तृतीयपंथी मतदारांची मतदार यादीत नाव नोंदणी करण्यात आली. तर संस्थेच्या सचिव दिशा पिंकी शेख यांनी मतदार यादीत नाव नोंदणीचे महत्त्व विशद करतानाच संजय गांधी निराधार योजना, नगरपरिषदेमार्फत घरकुल, स्मशानभूमी करिता जागा मिळावी यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन प्रांताधिकारी सावंत पाटील यांच्याकडे केली. याकामी पाठपुरावा करू असे आश्वासन सावंत पाटील यांनी दिले. याप्रसंगी निवडणूक नायब तहसीलदार हेमलता वाकडे, स्वीप नोडल अधिकारी गणेश पिंगळे, निवडणूक शाखा समनव्ययक संदिप पाळंदे, प्रितेश तांदळे उपस्थित होते.
१) "मतदार यादीत नाव नोंदणी केल्याने तृतीयपंथीयांना नवे ओळखपत्र मिळणार आहे. त्यामुळे आधार कार्ड काढणे, दुरुस्ती करणे व इतर योजनेचा लाभ घेता येणार आहे. आगामी सर्व निवडणुकांत १०० टक्के मतदान करून नवा आदर्श निर्माण करू." - दिशा पिंकी शेख, सचिव - तृतीयपंथी समाज सेवा संस्था
२) "स्वीप अंतर्गत मतदारसंघात मोठ्या प्रमाणात मतदार जनजागृती सुरू आहे. याकामी जिल्हा निवडणूक शाखा, प्रांताधिकारी किरण सावंत पाटील, तहसीलदार मिलिंदकुमार वाघ यांचे मार्गदर्शन मिळत असून सर्वांच्या सहकार्याने विधानसभा निवडणुकीत ७५ टक्क्यांपेक्षा अधिक मतदान करण्याचे उद्दिष्ट पूर्ण करू." गणेश पिंगळे, स्वीप नोडल अधिकारीफोटो कॅप्शन - श्रीरामपूर : स्विप अंतर्गत मतदार नोंदणी कार्यालय यांच्या वतीने तृतीयपंथी मतदारांची नोंदणी करताना प्रांताधिकारी किरण सावंत पाटील व इतर.
सर्वसामान्यांचा हक्काचे व्यासपीठ


Post a Comment
0 Comments