शिऊर बंगला येथे मराठा समाज बांधवांचा दोन तास रास्ता रोको....
वैजापूर प्रतिनिधी/ अरविंद पवार
तालुक्यातील शिऊर बंगला येथे दि.24रोजी सकाळी मराठा समाज बांधवाच्या वतीने मालेगाव-छ.संभाजीनगर महामार्गावर दोन तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.समाजाचे नेते प्रशांत सदाफळ तसेच मराठा क्रांती सेनेचे अजय सांळुके यांच्या नेतृत्वाखाली हजारो समाज बांधवांनी रस्त्यावर ठीया मांडला होता.मनोज जरांगे पाटलांनी उपोषणाचे हत्यार उपसुन सुध्दा सरकार मराठा आरक्षण देत नाही तसेच एकाही मराठा आमदाराने आरक्षणाला पाठींबा दिला नाही असा आरोप प्रशांत सदाफळ यांनी केला.वाहनांच्या दाेन्ही बाजुने दुरवर रांगा लागल्या होत्या.
यावेळी परीसरातील सर्व जाती धर्मातील समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थीत होते.शिऊर पोलीस ठाण्याचे सपोनी वैभव रणखांब यांनी आपल्या सहकाऱ्या समवेत चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.वाहतुक सुरळीत करतांना पोलीसांना मोठी कसरत करावी लागली.समाज बांधवांच्या वतीने मंडळ अधिकारी कोतकर,तलाठी जितेंद्र कळसकर यांना निवेदन देण्यात आले.
सर्वसामान्यांचा हक्काचा व्यासपीठ
सर्व जिल्हा तालुका प्रतिनिधी नेमणे आहे संपर्क:-9021816965



Post a Comment
0 Comments