श्रीरामपूर नगरपरिषदेसमोर सफाई कामगारांच्या प्रलंबित ठी आमरण उपोषण...
श्रीरामपूर (प्रतिनिधी)-
श्रीरामपूर नगरपरिषदेच्या सफाई कामगार, झाडू कामगार यांचे लाड-पागे कमिटीच्या शिफारसीनुसार वारसाहक्काने स्वेच्छानिवृत्ती नोकरीचा प्रश्न मार्गी न लागल्याने आज शुक्रवार दि. ११ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वा. शहरातील मा. नगरसेविका सौ. प्रणिती दिपक चव्हाण व दिपक चरणदादा चव्हाण यांनी सफाई कामगारांसह आज श्रीरामपूर नगरपरिषदेसमोर आमरण उपोषण सुरू केले आहे.
श्रीरामपूर नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाच्या सफाई कामगारांनी त्यांच्या वारसांना लाड पागे शासकीय कमिटीच्या शिफारशी नुसार स्वच्छा निवृत्तीद्वारे सेवानिवृत्तीचा अर्ज ४ महिन्यांपूर्वी सादर केला होता. सफाई कामगारांनी चतुर्थ श्रेणी कायम आस्थापनेवर सामाजिक न्याय विभागाच्या शासकीय अध्यादेशानुसार १५ वर्षापेक्षा जास्त सेवा झालेल्या कामगारांना जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या मार्फत शारिरीकदृष्टया विकलांग अथवा असक्षम दाखला देणे गरजेचे नसताना नगरपरिषदेच्या उप मुख्याधिकाऱ्यांनी नियमबाह्य त्यांना अनफिट सर्टिफिकेट देणेबाबत सर्व शासकीय नियमांची पायमल्ली तसेच उच्च न्यायालयाच्या आदेशाची पायमल्ली करून सफाई कामगारांना बेकायदेशीरपणे नोटीसा पाठवल्या होत्या. परंतु, तत्कालीन मुख्याधिकारी जाधव यांनी सदरच्या नोटीसा मागे घेतल्या असून त्यानंतरदेखील कामे रेंगाळली आहेत. सफाई कामगारांनी नोकरीसंदर्भातील अर्ज देवून १२० दिवस पूर्ण होत असून शासकीय अध्यादेशानुसार एक महिन्याचा कालावधी ग्राह्य धरला जातो. लवकरच कोणत्याही क्षणी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू शकते. त्यामुळे नोकरी मिळणेकामी अडथळा निर्माण होऊ शकतो तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या प्रमाणपत्राच्या बाबतीत मागील काही दिवसात भ्रष्टाचाराच्या अनेक बाबी पुढे आल्याने सर्वसामान्यांची बिकट परिस्थिती झालेली आहे. तरी सफाई सेवा देणाऱ्या कामगारांच्या वारसांना त्वरीत नियुक्तीपत्र देण्यात यावे व अधिक विलंब करू नये, अन्यथा आचारसंहितेपूर्वी सेवेमध्ये सामावून न घेतल्यास ऐन सणासुदीच्या काळात कामबंद आंदोलन करू, आम्हा सफाई,झाडु कामगार यांना प्रशासनाच्या गलथान कारभार मुळे आमरण ऊपोषण च्या माध्यमातून न्याय मिळाला नाहीतर नाईलाजाने शनिवारी स्वच्छता काम बंद करण्याचा निर्णय दुर्दैवाने घ्यावं लागेल असा इशारा उपोषणकर्ते माजी नगरसेविका सौ. प्रणिती दिपक चव्हाण व दिपक चरणदादा चव्हाण यांनी दिला आहे. यावेळी उपोषणस्थळी सफाई कामगार जितेंद्र चव्हाण, चेतन बागडे, राहुल आठवाल, बंटी चव्हाण, अनिल झिंगारे, संजय चव्हाण, बबलू जाधव, विनोद चव्हाण, भारत दाभाडे आदी उपस्थित होते.
सर्व सामान्य हक्काचे व्यासपीठ
जिल्हा तालुका गाव प्रतिनिधी नेमणे आहेत
संपर्क:-9021816965


Post a Comment
0 Comments