खोकर येथे मोफत आरोग्य तपासणी मोहिम...
श्रीरामपूर (प्रतिनिधी)
येथील शिवा ट्रस्ट संचलित शरदचंद्रजी पवार होमिओपॅथीक मेडीकल कॉलेज व हॉस्पिटल मार्फत खोकर येथे ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. बाळासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मोफत आरोग्य मोहिमेअंतर्गत तपासणी करण्यात आली.
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, राष्ट्रीय सेवा योजना व राष्ट्रीय होमिओपॅथीक आयोग, कम्युनिटी मेडीसीन विभाग व राष्ट्रीय क‘ीडा मंत्रालय दिल्ली यांच्या अंतर्गत दि. १० ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता ही मोहिम राबविली गेली. सदर मोहिमेत आरोग्य तपासणी, रक्त दाब तपासणी, टेम्परेचर, पल्स हार्ट रेट आदी तपासण्या करण्यात आल्या. तसेच संधिवात, मुतखडा, जुलाब, उलटी, पित्त, पायावरील सुज, त्वचेचे विकार, पोटाचे विकार, मधुमेह, उच्च रक्तदाब, मासिक पाळीचे आजार, क्षयरोग, वंध्यत्व निवारण, स्वेत पदर, मलबद्धता, पित्तशयाचे खडे, कर्करोग, स्वप्नदोष, मानसिक पाळीचे आजार, मुळव्याध, मानसिक आजार, भगंदर, ऍनिमिया, मायग‘ेन, कावीळ अशा विविध आजारांवर होमिओपॅथीक औषधे देण्यात आली.
यावेळी ट्रस्टचे संचालक दिलीपदादा पवार व प्रशासकीय अधिकारी श्रीकांत पवार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी तज्ञ डॉक्टरांनी विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्व पटवून देत आरोग्याची काळजी कशी घ्यावी या विषयी रुग्णांना मार्गदर्शन केले. सदर उपक‘मात सरपंच आशाबाई चक‘नारायण, उपसरपंच दीपक काळे, सदस्या पल्लवी पटारे, सोनाली सलालकर, रावसाहेब पवार, मनिषा पेरणे, नसिमा पठाण, अमिन सय्यद, दुर्गा पटारे, राजू चक‘नारायण, सिंधुबाई दळवी, ग‘ामसेवक हितेश ढुमणे आदी उपस्थित होते.
सदर उपक‘म कॉलेज व हॉस्पिटलचे प्राचार्य डॉ. रिजवान अहमद यांच्या नेतृत्वाखाली पार पडला. सदर उपक‘मात डॉ. बी. हरीश्चंद्रे, दर्शनी साबळे, प्रतिमा सोनवणे, आशिष जैस्वाल, विद्या दहे, सारिका घेरडे, प्राची आंबेकर, अनिता आगळे, रेखा पारखे, अभय पानसंबख, स्वाती खोबरेकर, विजय पवार, भगिरथ जाधव, सुरज थोरात, शुभांगी केदार, प्रदीप कळमकर, महेश कोकाटे, पौर्णिमा कळमकर, मुनझ्झा शेख, पियुष आचलिया, लता सगळगिळे, प्राजक्ता नागर, बिपीन जेठालिया, रियाज पटेल, समर रणसिंग यांनी आपली उपस्थिती नोंदविली.

Post a Comment
0 Comments