Type Here to Get Search Results !

दिव्यांग मुलांचा दिवाळी मेळा आशा स्कूल देवळाली येथे संपन्न

 दिव्यांग मुलांचा दिवाळी मेळा आशा स्कूल देवळाली  येथे संपन्न...


नाशिक/:-प्रतिनिधी

     आशा स्कूल देवळाली  येथे  दिव्यांग प्रशिक्षण केंद्रातर्फे या मुलांना रोजगार मिळावा, यासाठी दिवाळीच्या निमित्ताने दिवे रंगवणे, आकाश कंदील बनवणे, शोपीस वस्तू, मिठाई बॉक्स, ड्रायफूड‌्स बॉक्स बनवण्याचे प्रशिक्षण देण्यात येते. 

        यानिमित्त दिव्यांग मुलांचा आगळावेगळा दिवाळी मेळा आशा स्कूल देवळाली  येथे संपन्न झाला दिव्यांग मुलांनी स्वतःच्या हाताने तयार केलेल्या आकाश कंदील दिवे व शोभेच्या वस्तू विक्रीसाठी ठेवण्यात आले होते या कार्यक्रमासाठी मुख्याध्यापक दक्षिता सुरी मॅडम व सर्व शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले  या कार्यक्रमासाठी भारतीय सैनिक दलाचे अधिकारी यांनी भेट देऊन सर्व दिव्यांग मुलांचे कौतुक केले तसेच शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उपविभाग प्रमुख उमेश शिंदे इतर मान्यवर भेट देऊन.  शिक्षक व प्रमुख पाहुण्यांनी दिव्यांग मुलांना लग्न व सार्वजनिक कार्यक्रमात तसेच चित्रपट पाहण्यासाठी हॉटेलमध्ये जेवण्यासाठी व सार्वजनिक जीवनात त्यांना नेऊन दिव्यांग मुलांचा आत्मविश्वास वाढवावा समाजात ते दिव्यांग याची जाणीव न करून देता ते समाजाचा एक घटक आहे असा आत्मविश्वास त्यांना देण्यात यावा असे प्रोत्साहन प्रमुख पाहुणे व शिक्षकांनी करण्यात आले.








         सर्वसामान्यांचे हक्काचे व्यासपीठ

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका गाव प्रतिनिधी नेमणे आहे.

 संपर्क:-9021816965

Post a Comment

0 Comments