Type Here to Get Search Results !

विविध संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रीय श्रीराम संघाला पाठिंबा

 विविध संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रीय श्रीराम संघाला पाठिंबा 



श्रीरामपूर / प्रतिनिधी

राष्ट्रीय श्रीराम संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार सागर बेग यांच्या कामाने प्रभावित होऊन श्रीरामपूर येथील विविध संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रीय श्रीराम संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि अपक्ष उमेदवार सागर बेग यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे.

      आज राष्ट्रीय श्रीराम संघाच्या कार्यालयात श्रीरामपूर येथील शिंदे गटाचे वैद्यकीय मदत कक्ष व प्रसिद्धीप्रमुख राजेश वाव्हळ, भारतीय जनता पार्टीचे विशाल जाधव, शिवसेना शिंदे गटाचे वैद्यकीय कक्ष तालुका प्रमुख वाल्मिक भुजाडी यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह दाखल होऊन राष्ट्रीय श्रीराम संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष सागर बेग यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. तसेच सागर बेग यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करणार असल्याचा निर्धार देखील यावेळी त्यांनी व्यक्त केला.   

      यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात सागर बेग यांच्याशिवाय कोणताही हिंदुत्ववादी उमेदवार नसल्याने आम्ही हिंदुत्वाच्या मुद्द्यावर हिंदुत्ववादी उमेदवार सागर बेग यांना पाठिंबा देत आहे. आमचे सर्व कार्यकर्ते सागर बेग यांना निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असून सागर बेग यांच्या विजयाचा गुलाल अंगावर घेतल्याशिवाय राहणार नाही असेही यावेळी बोलताना ते म्हणाले. यावेळी सुनील शेळके, बैजू तांबे, प्रकाश मेहेत्रे, सागर शेटे, अशोक लगे सह आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



Post a Comment

0 Comments