Type Here to Get Search Results !

बाबाजींच्या ३५ व्या पुण्यस्मरण निमित्त जनशांती धर्मसोळ्याचे आयोजन...

 बाबाजींच्या ३५ व्या पुण्यस्मरण निमित्त जनशांती धर्मसोळ्याचे आयोजन...




श्री श्री १००८ महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरी महाराजांच्या प्रमुख उपस्थितीत...

प्रतिनिधी/नाशिक

         निष्काम कर्मयोगी शिवयोगी जगद्‌गुरू जनार्दन स्वामी (मौनगिरीजी) महाराज अर्थात प.पु. बाबाजींनी अध्यात्मिक-सामाजिक कार्याची पताका देशभरात फडकविली. गुरुकुल शिक्षण, कृषीसेवा, गोसेवा, अनुष्ठान परंपरा व धर्मसंस्कार सोहळ्यांच्या माध्यमातुन लाखो कुटूंबांमध्ये शिवभक्ती निर्माण केली. लाखो लोक व्यसनमुक्त करून सशक्त समाजनिर्मितीसाठी महत्वपूर्ण योगदान दिले. हीच परंपरा श्री बाबाजीच्या कृपाशिर्वादाने त्यांचे उत्तराधिकारी अध्यात्म शिरोमणी श्री श्री १००८ महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरीजी महाराज पुढे नेत आहेत. त्यांच्या प्रेरणेने 'श्री क्षेत्र जनशांती धाम' श्री क्षेत्र ओझर नाशिक येथे हे भव्यदिव्य अध्यात्मिक तीर्थक्षेत्र विकसित झाले आहे.

          या पावन भूमीवर श्री बाबाजींच्या ३५ व्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने 'जनशांती धर्म सोहळा' या कार्यक्रमाचे आयोजन ५ डिसेंबर ते १२ डिसेंबर दरम्यान आयोजित करण्यात आले आहे. या सोहळ्यानिमित्तृ जपानुष्ठान, १११ कुंडी यज्ञ श्रीमद् भागवत पारायण नामस किर्तन, अखंड नंदादीप, महिला जप आणि या सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे ११ डिसेंबर २०२४ रोजी रोजी सकाळी १० वाजता उत्तर अधिकारी महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरी महाराज यांच्या संकल्पनेतून पूर्णत्वास गेलेले भगवान बानेश्वर महादेव मंदिर अर्थात जनशांती धाम यावर १७५ स्वर्ण कलश स्थापित होणार असून यामध्ये ४१ सुवर्ण कलश हे मोठे असून या कलशाची विधीवत पूजा हजारो भाविकांच्या उपस्थितीमध्ये व देशभरातील पूजनीय व मान्यवराच्या शुभ हस्ते कलश व मूर्ती स्थापनेचा हा सोहळा दिनांक ११ तारखेला संपन्न होणार आहे या पुण्यस्मरणाची समाप्ती १२ डिसेंबर रोजी संपन्न होणार असून.

      या भव्य दिव्य सोहळ्याची तयारी गेल्या सहा महिने पासून महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली जय बाबाजी भक्त परिवार करत आहे येणाऱ्या लाखो भाविकांची प्रसादाची पिण्याच्या पाण्याची व आरोग्याची व्यवस्था करण्यात आली असून महाप्रसादासाठी ११११ साखर वर पोत्यांची बुंदी दी करण्यात येणार आहे सर्व भाविक भक्तांनी परम पूज्य बाबाजी च्या ३५ व्या पुण्यस्मरणानिमित्त आयोजित जनशांती धर्म सोहळ्याचा लाभ घेऊन परमपूज्य बाबाजींचा आशीर्वाद प्राप्त करावा असे आव्हान जय बाबाजी भक्त परिवार महाराष्ट्र व जनशांती धर्म सोहळा समितीच्या वतीने प्रसिद्धी प्रमुख राजेंद्र पवार यांनी केले आहे.



Post a Comment

0 Comments