Type Here to Get Search Results !

नासिक ग्रामीण पोलीस दलातर्फे "तक्रार निवारण" दिनाचे आयोजन...

 नासिक ग्रामीण पोलीस दलातर्फे "तक्रार निवारण" दिनाचे आयोजन... 

  नाशिक प्रतिनिधी/- रमेश पांडे

         मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांनी राज्यामध्ये शासनाच्या प्रशासनिक विभागांसाठी "क्षेत्रीय कार्यालयासाठी १०० दिवसांचा कृती आराखडा" निश्चित केलेला असुन त्या धर्तीवर क्षेत्रीय शासकिय व निमशासकिय कार्यालयाकरीता आगामी १०० दिवसांमध्ये ०७ कलमी कृती आराखडा तयार करून त्या मुद्दयांवर प्रभावी कार्यवाही करण्याबाबत निर्देश दिलेले आहेत. त्यास अनुसरून नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस दलातर्फे आज दि. ०१/०२/२०२५ रोजी तिस-या 'तक्रार निवारण' दिनाचे आयोजन करण्यात आले होते.

      सदर तक्रार निवारण दिनाचे अनुषंगाने नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. विक्रम देशमाने यांचे मार्गदर्शनानुसार अपर पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण श्री. आदित्य मिरखेलकर व अपर पोलीस अधीक्षक मालेगाव श्री. अनिकेत भारती यांनी, तसेच ०७ उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी पोलीस ठाणे निहाय भेटी देवुन पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असलेल्या तक्रारीमधील फिर्यादी व तक्रारदार यांना पोलीस ठाणेस बोलावुन त्यांचे गुन्हा / तकारीच्या अनुषंगाने मार्गदर्शन व समुपदेशन केले. तसेच जिल्हयातील ४० पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांनी देखील वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार तकार निवारण दिनानिमित्त तकरदारांच्या समस्या जाणुन घेवुन त्यांचे तक्रारींचे निरसन केले आहेत.

        क्षेत्रीय कार्यालयासाठी १०० दिवसांचा कृती आराखडयाचे कामकाज सुरू झाल्यापासुन शनिवार दि. १८/०१/२०२५ राबविलेल्या पहिल्या तक्रार निवारण दिनाअंतर्गत १३८२ तक्रारी अर्ज, दुस-या तकार निवारण दिन शनिवार दि. २५/०१/२०२५ रोजी राबवुन त्यात ७६० तकारी अर्ज, तसेच आज दि. ०१/०२/२०२५ रोजी आयोजित तिस-या तकार दिनानिमित्त ९२० तक्रारी अर्ज, अशा पध्दतीने गेल्या ०३ आठवडयात मिळून एकुण ३०६२ तक्रारी निकाली काढण्यात आलेल्या आहेत. त्यामध्ये प्राप्त तकारीच्या अनुषंगाने काही तकारीसंदर्भात दखलपात्र व अदखलपात्र गुन्हे नोंद करण्याची कार्यवाही सुरू असून, काही तकारी दिवाणी स्वरूपाच्या असल्याने महसुल विभाग / दिवाणी न्यायालयात दाद मागण्यास्तव तक्रारदारांना समज देण्यात आली आहे.

                  जाहिराहात व बातमीसाठी 

संपर्क:- मुख्यसंपादक मयुर फिंपाळे,9021816965


Post a Comment

0 Comments