स्वर्गीय सविताताई वारकऱ्यांच्या अन्नपूर्णा होत्या ह.भ.प संदिपानजी गुरुजी शिवगिरी आश्रम बाजाठाणकर...
वैजापूर प्रतिनिधी //रवींद्र पवार
वैजापूर तालुक्यातील श्रीक्षेत्र चेंडूफळ या ठिकाणी आज स्वर्गीय सौ. सविता मदनराव पवार यांच्या प्रथम वर्ष श्रद्धा निमित्त.
शिवगिरी आश्रमाचे मठाधिपती ह.भ.प.संदिपानजी महाराज गुरुजी बाजाठाण यांची कीर्तन सेवा संपन्न झाली यावेळी महाराजांनी स्वर्गीय सौ सविताताई पवार यांच्या विषयी बोलताना सांगितले की सविता ताईंच्या हातून साधुसंतांची वारकऱ्यांची खूप मोठ्या प्रमाणात सेवा झाली.श्रीक्षेत्र गोदाधाम सराला बेटाचे महंत पीठाधीश हिंदू धर्म रक्षक योगी ह भ प रामगिरीजी महाराज ज्यावेळी भेट देण्यासाठी आले त्यावेळी त्यांनी आवर्जून सांगितली होती की आमच्या हक्काची जागा कमी झाली.सेवा अशी असावी की निस्वार्थी कुठलाही लोभ नसलेली किंचितच लाखोत एक व्यक्ती आयुष्यात स्वर्गीय सविताताईंसारखी असू शकतात.कुटुंबात सर्वात मोठ व्यक्तिमत्व काय असतं ते पवार कुटुंबासाठी आदर्श व्यक्ती आदर्श पत्नी आदर्श सून आदर्श भाऊजाई आदर्श आई आदर्श चुलती सर्व गुणसंपन्न असलेल्या स्वर्गीय सविताताई मदनराव पवार यांना श्रद्धांजली वाहण्याकरता आप्तेष्ट सगळी सोयरे सामाजिक राजकीय सांस्कृतिक अध्यात्मिक क्षेत्रातील मान्यवरांनी श्रद्धांजली वाहिली यावेळी वैजापूर तालुक्याचे आमदार रमेश पाटील बोरणारे सर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वैजापूर तालुका अध्यक्ष विजय पाटील पवार पंचक्रोशीतील भजनी मंडळ माता भगिनी ग्रामस्थ वैजापूर तालुक्यातील राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते ह भ प किरण गुरु यांनी विधिवत पूजन करून आशीर्वाद दिले.
आलेल्या मान्यवरांनी स्वर्गीय सौ सविताताई मदनराव पवार यांना गहिवरल्या अंतकरणाने श्रद्धांजली अर्पण केली.
मुख्यसंपादक मयुर फिंपाळे :- 9021816965


Post a Comment
0 Comments