Type Here to Get Search Results !

छावा चित्रपट सर्व शालेय विद्यार्थ्यांना प्रत्येक शाळेत दाखविण्यात यावा, भाजपा जिल्हा सरचिटनिस मनिषाताई व्यवहारे यांची मागणी...

 छावा चित्रपट सर्व शालेय विद्यार्थ्यांना प्रत्येक शाळेत दाखविण्यात यावा, भाजपा जिल्हा सरचिटनिस मनिषाताई व्यवहारे यांची मागणी...

गंगापुर/प्रतिनिधी:- मयुर फिंपाळे

       स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांची शौर्यगाथा उलगडणारा छावा चित्रपट सर्व शालेय विदयार्थ्यांना प्रत्येक शाळेत दाखविण्यात यावा अशी मागणी भाजपा जिल्हा सरचिटनिस मनिषाताई व्यवहारे यांनी केली.

          मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस, आमदार प्रशांत बंब व जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांची शौर्यगाथा उलगडणारा आणि जीवन चरित्रावर आधारित असलेल्या छावा चित्रपटास उदंड प्रतिसाद मिळत आहे. चित्रपट पाहिल्यानंतर सिनेमागृहाबाहेर येणा-या प्रेक्षकांच्या डोळ्यातुन अश्रु अनावर झाल्याचे दिसुन येत आहे.चित्रपटातील प्रसंग तितकेच शिव भक्ताचे रक्त सळसळ करणारे आहे छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत महाराष्ट्र भुमित अखंड इतिहास रचला आहे छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर आधारीत जीवनपट सर्व सामान्य ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शाळेमध्ये दाखविण्यात यावा ग्रामीण विद्यार्थ्यांची शहरात जावुन चित्रपट पाहण्याची परिस्थिती नसल्यामुळे ग्रामीण भागातील शाळेमध्ये छत्रपती संभाजी महाराज यांची शौर्यगाथा उलगडणारा छावा हा चित्रपट दाखविण्यासाठी निर्णय घ्यावा त्यामुळे विद्यार्थ्यांना इतिहासाची माहीती मिळनार आहे यासाठी छावा हा चित्रपट सर्व शाळेवर दाखविण्यात यावा अशी मागणी भाजपा जिल्हासरचिटनीस मनिषा कृष्णकांत व्यवहारे यांनी केली आहे.


आपल्या परिसरातील बातम्या व जाहिरातीसाठी 

संपर्क:- मुख्यसंपादक:-मयुर फिंपाळे मो.9021816965

Post a Comment

0 Comments