Type Here to Get Search Results !

जगदगुरु स्वामी शांतिगिरीजी महाराजांचे नाशिक शहरात जोरदार स्वागत व पूजन...

 जगदगुरु स्वामी शांतिगिरीजी महाराजांचे नाशिक शहरात जोरदार स्वागत व पूजन...


जगद्गुरू स्वामी शांतिगिरी महाराजांची नाशिक मध्ये मिरवणूक

नाशिक/प्रतिनिधी:- मयुर फिंपाळे 

      प्रयागराज येथील महाकुंभनगरीत जगद्‌गुरू उपाधी व पट्टाभिषेक सोहळ्यानंतर अध्यात्म शिरोमणी जगद्गुरू स्वामी शांतिगिरी (मौनगिरी) महाराज यांचे प्रथमच नाशिक शहरात आगमन झाले. त्यांचे जय बाबाजी भक्त परिवाराच्या वतीने फटाक्यांची आतषबाजी व पुष्पवृष्टी करीत मिरवणुकीने स्वागत करण्यात आले.

        कालिदास कलामंदिर येथे स्वागत व पूजन सोहळा पार पडला. व्यासपीठावर पंचमुखी हनुमान मंदिराचे महंत स्वामी भक्तिचरणदासजी महाराज, सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्टचे विश्वस्त अॅड. दीपक पाटोदकर, महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे अध्यक्ष कैलास भोसले, जयपूर येथील पोलिस अधिक्षक पंकज चौधरी, स्वामी जनेश्वरगिरीजी महाराज, विवेकानंद महाराज, नागेश्वरानंद महाराज, स्वामी दौलतानंद महाराज, रमणगिरी महाराज, देवानंदगिरी महाराज, श्रीपादानंद महाराज,गोरक्षगिरी महाराज, खा. भगरे, विष्णूगिरी महाराज, परमेश्वरगिरी महाराज उपस्थित होते. यावेळी विद्यापीठस्तरीय सर्वोत्कृष्ट महाविद्यालय शासकीय पुरस्कार विजेते सटाणा येथील कर्मवीर आबासाहेब कला महाविद्यालयाचे डॉ. विजय मेधने व नाशिक येथील के. व्ही. नाईक महाविद्यालयाचे प्राचार्य संजय सानप यांचा गौरव करण्यात आला. तसेच, जगद्‌गुरू स्वामी शांतीगिरीजी महाराज यांचे पूजन करण्यात आले.

      जगद्‌गुरू या उपाधीला हिंदू धर्मात महत्त्वाचे स्थान आहे. संत तुकाराम महाराज यांच्या सारख्या महान संतांना यांना जगद्‌गुरू हा बहुमान आहे. या उपाधीमुळे मोठी जबाबदारी आपल्यावर आली आहे. ही जबाबदारी पूर्ण विनम्र भावाने पार पाडावी लागणार आहे. हा सन्मान माझा नसून, जय बाबाजी भक्त परिवाराचा आहे, असे मत स्वामी शांतीगिरीजी महाराज यांनी व्यक्त केले.


आपल्या परिसरातील बातमी व जाहिरातीसाठी

संपर्क:- मुख्यसंपादक:- मयुर फिंपाळे मो.9021816965

Post a Comment

0 Comments