ओझरला जगद्गुरु शांतीगिरी महाराजांचे भव्य स्वागत...
नाशिक/प्रतिनिधी
निष्काम कर्मयोगी जगदगुरु जनार्दन स्वामी मौन गिरिजी महाराज धर्मपीठाचे पीठाधीश्वर अनंत विभूषित स्वामी शांतीगिरीजी मौनगिरीजी महाराज यांना प्रयागराज येथील कुंभमेळ्यात जगदगुरु ही विशेष उपाधी मिळाल्यानंतर नाशिक जिल्ह्यात ओझर येथे त्यांचे प्रथमच आगमन झाले. भक्त परिवाराच्यावतीने त्यांचे 'जय बाबाजी' अशा प्रचंड जयघोषात भव्य पुष्पहार, गुलाल व फुलांची मुक्त उधळण करत, फटाक्यांच्या तुफान आतिषबाजीत जोरदार स्वागत करण्यात आले.
यावेळी आयोजित स्वागत मिरवणुक लक्षवेधी ठरली. मिरवणुकीनंतर जनशांती धाम परिसरात भव्य स्वागत व पूजन सोहळा संपन्न झाला. कठोर तपस्वी स्वामी शांतिगिरीजी मौनगिरीजी महाराज यांनी जप, तप, अनुष्ठान, श्रमदान, गोसेवा, गुरुकुल, श्रमदान या परंपरा अतिशय श्रद्धापूर्वक जपल्या आहेत. प्राचीन भारतीय संस्कृतीच्या व हिंदू धर्माच्या प्रचार प्रसारासाठी महाराष्ट्रासह देशभरातील प्रमुख ठिकाणी जवळपास १०८ पेक्षा जास्त आश्रमाची निर्मिती त्यांनी केली. त्यांच्या या अध्यात्मिक, सामाजिक कार्याची विशेष दखल घेऊन श्री शंभू पंच दशनाम जुना आखाड्याच्या वतीने प्रयागराज येथे तब्बल १४४ वर्षानंतर आलेल्या महत्वपूर्ण महाकुंभ मेळ्यात जगदगुरु ही उपाधी स्वामी शांतीगिरिजी मौनगिरीजी महाराज यांना देण्यात आली. यानंतर प्रयागराज येथून प्रथमच त्यांचे ओझर परिसरात आगमन झाले. भक्त परिवाराच्या वतीने त्यांचे लक्षवेधी मिरवणूक व विशेष सोहळ्याच्या आयोजनाने जोरदार स्वागत करण्यात आले.
उपस्थित हजारो भाविकांनी जगदगुरु स्वामी शांतीगिरिजी महाराजांना वंदन करून शुभकामना दिल्या. उपस्थितीत हजारो भाविकांना मार्गदर्शन करतांना प्रारंभीच मी परमपूज्य बाबाजींचा सर्वात छोटा भक्त आहे, असे सांगून कितीही मोठी उपाधी मिळाली असली तरी सदगुरूंपेक्षा कोणीही मोठे नाही. अर्थातच 'सबसे बडा गुरु.. गुरुसे बडा गुरू का नाम और काम.. याची आठवण त्यांनी उपस्थितांना करून दिली. साधू-संत व भगवंतांच्या इच्छेनुसार मिळालेली जबाबदारी विनम्र भावनेने पार पाडू, असे भावूक उदगार जगदगुरु स्वामी शांतीगिरीजी महाराज यांनी यावेळी सांगितले. यावेळी व्यासपीठावर स्वामी जनेश्वरानंद गिरीजी महाराज, देवानंदगिरिजी महाराज, ऋषिकेशानंद गिरीजी महाराज, महादेवगिरिजी महाराज, अवीमुक्तेश्वरानंद महाराज, नागेश्वरानंद महाराज, श्रीपादानंद महाराज, दयानंद महाराज, रामेश्वरानंद महाराज, पुंडलिकानंद महाराज, रवींद्रानंद महाराज यांसह आश्रमीय संत, विविध क्षेत्रातील मान्यवर व हजारो भाविक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवा काका अंगुलगावकर यांनी केले. स्वामी जनेश्वरानंद गिरीजी महाराज व अविमुक्तश्वरानंद महाराज यांनी आपल्या प्रवचनातून जगदगुरु कि शांतीगिरिजी महाराजांच्या गुरुभक्तीची व विशाल कार्याची माहिती उपस्थितांना दिली. आमदार दिलीपराव बनकर यांनी आपल्या मनोगतात बाबाजींच्या निष्काम कर्मयोगी कार्यामुळेच जनसेवा करण्यास ऊर्जा मिळते असे सांगितले.
मुख्यसंपादक:-मयुर फिंपाळे,9021816965




Post a Comment
0 Comments