शनिवारी मुठेवाडगावमध्ये रंगणार खेळ पैठणी कार्यक्रम...
प्रतिनिधी/मयुर फिंपाळे
माजी खासदार डॉ.सुजय दादा विखे पाटील मित्र मंडळ व मैत्रिय महिला ग्रामसंघ आयोजित खेळ पैठणीचा व महिलांचा सन्मान सोहळ्याचे शनिवार 22 मार्च रोजी श्री संत तुळशीराम महाराज सप्ताह ग्राउंड मुठेवाडगाव येथे सायंकाळी 5.30 वा आयोजित करण्यात आला आहे.
विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांचा गुण गौरव करण्यात येणार आहे.दरम्यान विविध प्रकारचे मनोरंजनात्मक खेळ, स्पर्धा,उखाणे, प्रश्नमंजुषा, गाणी गप्पा गोष्टी आदीसह विविध गेम्समधून सहभागी महिला भगिनींना पैठणी साडीसह गृहउपयोगी वस्तू जिंकण्याची संधी मिळणार आहे.याशिवाय कार्यक्रमात सहभागी महिलांच्या नावाचा लकी ड्रॉ काढून महिलांना खास आकर्षक बक्षिसे मिळणार आहे.




Post a Comment
0 Comments