जय बाबाजी भक्त परिवारातर्फे पुणतांबा परिसरात श्रमदान शिबीर...
दक्षिण काशीचे रुपडे बदलले; भाविकांमध्ये समाधान
प्रतिनिधी/श्रीरामपूर
पुणतांबा येथे जय बाबाजी भक्त परिवाराच्या सुमारे दीड हजार महिला पुरुषांनी येथे पुरातन मंदिरे व घाट दुरुस्तीसाठी राबवलेल्या एकदिवसीय महा श्रमदान शिबिरामुळे दक्षिण काशीचे रुपडे पूर्णपणे बदलले आहे यामुळे भाविकात समाधान व्यक्त केले जात आहे,राज्याची दक्षिण काशी म्हणून ओळख असलेल्या श्रीक्षेत्र पुणतांबा येथील गोदावरी नदी काठावरील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी सुमारे चारशे वर्षांपूर्वी बांधलेला सुंदर घाट व अडीचशे पुरातन मंदिरासह बारा ज्योतिर्लिंग महादेव मंदिर आहे यामधील अनेक मंदिरांची पडझड झालेली आहे दोन महिन्यापूर्वी येथील दोन मंदिरातील मूर्तीच्या विटंबना प्रकरणानंतर जगदूरु स्वामी शांतिगिरीजी महाराज यांनी येथे भेट दिली असता पडझड झालेल्या मंदिरांची दुरुस्ती सर्वांच्या सहकार्यातून करण्याची संकल्पना मांडली होती.रविवारी पहाटे महामंडलेश्वर श्रीमंत जगद्गुरु शांतिगिरी महाराज यांच्या हस्ते विधिवत पूजा होऊन या मोहिमेला सुरुवात करण्यात आली यामध्ये नाशिक,जालना,अहिल्यानगर व छत्रपती संभाजी नगर येथून सुमारे दीड हजार महिला व पुरुष तसेच असंख्य कारागीर यामध्ये सहभागी झाले होते गोदावरी नदी काठावरील दोन्ही घाट व बारा मंदिराची दुरुस्ती यावेळी करणयात आली.
या मोहिमेला पुणतांबेकर यांनी मोठे योगदान दिले आहे या एकदिवसीय महा श्रमदान शिबिरामुळे दक्षिण काशीतील मंदिरांनी कात टाकली असून सर्व मंदिरांचे रूपडे पूर्णपणे बदलले असल्याने मंदिरे आकर्षक झाली आहे.
यामुळे भाविकांसह नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून या एकजुटीने राबवलेल्या मोहिमेतून किती बदल होऊ शकतो याचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे,जय बाबाजी भक्त परिवाराचे होते सुरू झालेली मोहीम पुढील काळातही सुरू ठेवून मंदिरांसह गावाचा कायापालट सर्वांच्या सहकाऱ्यांच्या प्रयत्नातून केला जाणारा असल्याचे मंदिर स्वच्छता सेवा अभियान समितीच्या सदस्यांनी सांगितले.
भग्नमूर्ती ही बदलणार
पुणतांबा येथील मंदिर दुरुस्तीचा मोहिमेला आज सुरुवात झाली असून दुसऱ्या टप्प्यात काही मंडळातील भग्न झालेल्या मूर्ती व कळस बदलण्यात येणार आहे तसेच गोदावरी नदी पवित्र व स्वच्छ ठेवण्यासाठी गटारीचे पाणी व कपडे नदीमध्ये न टाकता स्वतंत्र व्यवस्था ग्रामपंचायतीने करावी तसेच ग्रामस्थांनी यासाठी सहकार्य करण्याचे आव्हान जगद्गुरु शांतिगिरीजी महाराज यांनी केले यावेळी नागेश्वर महाराज उपस्थित होते.
बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्कः-मुख्यसंपादक मयुर फिंपाळे
मो.9021816965





Post a Comment
0 Comments