लग्नातील खर्चाला फाटा देऊ सशस्त्र सेना दलला दिला निधी डॉ. मुठे यांचा प्रेरणादायी उपक्रम...
श्रीरामपूर/प्रतिनिधी
लग्नातील सत्काराच्या खर्चाला फाटा देऊन नुकतेच झालेल्या भारत पाकिस्तान च्या सिंदूर ऑपरेशनच्या निमित्ताने भारतीय सशस्त्र सेना दलाला निधी देण्याचा चांगला उपक्रम भारतीय जनता पार्टीचे तालुका सरचिटणीस डॉ शंकरराव वसंतराव मुठे यांनी त्यांचे चिरंजीव जय (आकाश) व भाऊसाहेव पुंजाजी शेरकर यांची कन्या मयुरी यांचा नुकताच विवाह मोठ्या थाटात लक्ष्मी लॉन्स खोकर फाटा येथे संपन्न झाला. यावेळी लग्नातील फेटे व इतर खर्चास फाटा देऊन सदरची रक्कम ही श्री संत तुळशीराम महाराज देवस्थान मुठेवडगांव, संत निरंकारी मंडळ श्रीरामपूर, भारतीय सशस्त्र सेना दलास रोख रक्कम देण्यात आली.
सदरची रक्कम ही श्रीरामपूर नायव तहसीलदार वाकचौरे यांच्याकडे भारतीय जनता पार्टीचे माजी तालुका अध्यक्ष दीपक अण्णा पटारे व मुलाचे वडील भारतीय जनता पार्टीचे तालुका सरचिटणीस डॉ. शंकरराव मुठे, दत्ता जाधव, गणेश (भैय्या) भिसे, नायब तहसीलदार बाबासाहेब गोसावी यांच्या हस्ते सुपूर्त करण्यात आली.

Post a Comment
0 Comments