गंगापूरची लाचखोर पुरवठा निरीक्षण अधिकारी कांचन कांबळे ACB च्या जाळ्यात!,४० हजारांची लाच घेताना रंगेहात पकडली!!
【 रास्त भाव दुकानदार यांच्य वारसाला मागितली ७० हजारांची लाच 】
प्रतिनिधी/गंगापूर (छत्रपती संभाजीनगर)
रास्त भाव दुकानाचे निलंबन आदेश मागे घेण्यासाठी ७० हजार रुपयांची लाच मागणाऱ्या आणि त्यापैकी ४० हजार रुपयांचा लाच स्वीकारणाऱ्या गंगापूरच्या महिला पुरवठा निरीक्षकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शनिवारी (दि.१४) दुपारी जीएसटी भवन गेटजवळ रंगेहाथ अटक केली. कांचन नामदेवराव कांबळे (३४, रा. रुबी इनसिग्निया अपार्टमेंट, हमालवाडा) असे लाच घेताना पकडण्यात आलेल्या महिला पुरवठा निरीक्षकाचे नाव आहे. तिच्याविरोधात वेदांतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
तक्रारदाराच्या आजोबांच्या नावावर काटेपिंपळगाव (ता. गंगापूर) येथे रास्त भाव दुकान क्र. २९ आहे. या दुकानाचे निलंबन आदेश मागे घेण्यासाठी कांचन कांबळे हिने स्वतःसाठी व जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्यासाठी एकूण ७० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. तक्रारदारास लाच देण्याची इच्छा नसल्याने त्याने १२ जून रोजी एसीबीकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर झालेल्या तडजोडीत कांबळे हिने स्वतःसाठी १५ हजार तक्रारदाराच्या पुरवठा अधिकाऱ्यासाठी २५ हजार रुपये अशी एकूण ४० हजार रुपयांची लाच स्वीकारण्याचे मान्य केले.
त्यानंतर एसीबीने रेल्वे स्टेशन परिसात सापळा रचला. १४ जून रोजी दुपारी छत्रपती संभाजीनगर शहरातील जीएसटी भवनच्या गेटजवळ लाच स्वीकारत असताना एसीबीच्या पथकाने कांबळे हिला रंगेहाथ पकडले.आयफोनसह दोन मोबाइल, ४३ हजारांची रक्कम जप्त कांबळेच्या गाडीच्या डिक्कीतून ४० हजार रुपयांची लाच रक्कम सापडली असून, तिच्या अंगझडतीदरम्यान पर्समध्ये ३ हजार रुपये, आयफोनसह दोन मोबाईलही जप्त करण्यात आले. दरम्यान, तिच्या घराची झडती घेण्यात येत असल्याची माहितीही एसीबीकडून देण्यात आली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक संदिप आटोळे, अप्पर अधीक्षक मुकुंद आघाव, उप अधीक्षक सुरेश नाईकनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक वाल्मीक कोरे, हवालदार राजेंद्र जोशी, डोंगरदिवे, सी.एन. बागुल, पुष्पा दराडे, कुंटे आदी अधिकाऱ्यांनी केली.
➡️आवाहन⬅️
जिल्ह्यातील नागरिकांनी शासकीय कामासाठी कोणीही अनधिकृतरित्या लाचेची मागणी केल्यास टोल फ्री क्रमांक 1064 किंवा 0240-2344050 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केले आहे.




Post a Comment
0 Comments