Type Here to Get Search Results !

श्रीरामपूर तालुक्यातील कमलपुर बंधाऱ्याचे युद्ध पातळीवर काम सुरू राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे साहेब यांच्या आदेशाचे तंतोतंत पालन...

श्रीरामपूर तालुक्यातील कमलपुर बंधाऱ्याचे युद्ध पातळीवर काम सुरू राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे साहेब यांच्या आदेशाचे तंतोतंत पालन...

 सप्ताह प्रतिनिधी/ रवींद्र पवार 

          श्रीरामपूर तालुक्यातील तसेच मराठवाड्याचे प्रवेश द्वार म्हणून ओळखला जाणारा कमलपुर बंधारा हा सद्गुरु योगीराज गंगागिरी महाराज अखंड हरिनाम सप्ताह वर्ष १७८ वे साठी महत्त्वाचा दुवा ठरणार आहे श्रीक्षेत्र सरला बेटाचे महंत पिठाधीश ह.भ.प.हिंदू धर्म रक्षक रामगिरीजी महाराज,नामदार राधाकृष्ण विखे साहेब यांनी काही दिवसापूर्वीच सप्ताह कार्यालयाचे उद्घाटन केले त्यावेळी शब्द दिला होता की कमलपुर बंधाऱ्याचे काम तुम्हाला लवकरच पूर्ण झालेले दिसेल त्याचा प्रत्यय आज आपणा सर्वास पाहावयास मिळाला माननीय नामदार राधाकृष्ण विखे साहेब यांनी त्यावेळी असेही सांगितले की शनिदेवगाव उच्च पातळी बंधारा देखील पूर्णत्वास जाणार आहे त्याची आस परिसरातील श्रीरामपूर वैजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना लागलेली आहे.कमलपूर बंधाऱ्याच्या दुरुस्तीमुळे सप्ताह स्थळी येण्यासाठी भाविकांना फार मोठी मदत होणार आहे.लाखो भाविकांची वर्दळ या कमलपूर चांदेगाव आवलगाव बंधाऱ्यावर होणार आहे माननीय मंत्री महोदय विखे साहेब यांनी टाकळीभान,भोकर,भामाठाण,माळवाडगाव रस्ते देखील आपण सप्ताह आधी पूर्ण करू असे देखील आश्वासन दिलेले आहे. 

       योगीराज गंगागिरी महाराज अखंड हरिनाम सप्ताह वर्ष 178 वा यशस्वीरित्या संपन्न व्हावा यासाठी वैजापूर तालुक्याचे आमदार प्राध्यापक रमेश पाटील बोरनारे,माजी आमदार भाऊसाहेब तात्या चिकटगावकर,माझी अर्थ बांधकाम सभापती अविनाश पाटील गलांडे, दिनेश भाऊ परदेशी,श्रीक्षेत्र सरला बेटाचे विश्वस्त ह.भ.प मधुकर महाराज,सरला बेटाचे विश्वस्त बाबासाहेब पाटील चिडे, नितीनजी दिनकर, दीपक पटारे,वंदनाताई मुरकुटे,ह.भ.प.प्रेम मूर्ती  हरी शरण गिरीजी महाराज,ह.भ.प.संदीपानजी महाराज,ह.भ.प योगेंद्र गिरीजी महाराज तसेच सप्त कृषीतील कमिटी मेंबर जेसीबी धारक ट्रॅक्टर धारक देणगी धारक माता भगिनी तरुण मंडळ मोठ्या उत्साहाने या सप्ताहासाठी आपले योगदान देत आहे.





Post a Comment

0 Comments