जगदगुरु शांतिगिरीजी महाराजांच्या प्रेरणेने ओझरला सोमप्रदोष उत्साहात...
ओझर /प्रतिनिधी :- अमर आढाव
निष्काम कर्मयोगी जगदगुरु जनार्दन स्वामी महाराजांचे उत्तराधिकारी अनंत विभूषित जगदगुरु स्वामी शांतिगिरीजी मौनगिरीजी महाराज यांनी ओझर येथे निर्माण केलेल्या देवभूमी जनशांती धाम येथे सोमप्रदोष निमित्त अभिषेक पूजन, सत्संग,प्रवचन,श्री बाणेश्वर महादेव मुकुट मिरवणूक सोहळा मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.विधी पाठ,सत्संग, महाप्रसाद व महाआरतीने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी महाअभिषेक नंतर भगवान बाणेश्वर महादेवाची ढोल ताशाच्या गजरात लक्षवेधी मुकुट मिरवणूक उत्साहात संपन्न झाली.मिरवणुकीत ३६ ब्रह्मवृंद तसेच भजनी मंडळ उपास्थित होते.यावेळी आश्रमीय संत स्वामी परमेश्वरानंद महाराज यांनी सदगुरु महिमा व प्रदोषव्रत महत्त्व तसेच जनशांती धाम येथे स्थापन केलेल्या देवी देवतांची माहिती उपस्थितांना दिली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हृदयानंद माऊली,राहुल शिंदे यांनी केले.संत,अतिथी व ब्राम्हण पूजन यावेळी संपन्न झाले.व्यासपीठावर देवानंदगिरी महाराज, ऋषिकेशागिरी महाराज,ऋग्वेदानंद महाराज,दयानंद महाराज, ऋषभदेवानंद महाराज, वेद गुरुकुलमचे संचालक वेदशास्त्र संपन्न पंडित धनंजय जोशी, पंडित महेश गुरु शिवपुरी,भालचंद्र कासार,मधुकरराव शिंदे,सुभाष शेजवळ,रवींद्र चौधरी,हरिश्चंद्र पवार,सुनील मोरे, मधुकर नवघीरे,अण्णासाहेब भडके,पुंडलिक शिवले,माधवराव चौरे,पांडुरंग जाधव,गणेश चौधरी,हेमंत मोहाडकर, ज्ञानेश्वर शेजवळ,संदीप चौधरी,भारत नवघिरे,अरुण चौधरी,रामेश्वर शिवले, गणपत गोडे,भगवान शिलेदार,दौलतराव गायकवाड, सीताराम बिडवे,प्रभाकर निकुंभ,ओंकार गोसावी,व्यवस्थापक संतोष अनवट, के.टी.काशीद, शालिग्राम आढाव, रवींद्र भोई,ज्ञानेश्वर आढाव,सचिन आढाव,अच्युत आढाव,शिवानंद आढाव,अथर्व आढाव, कृष्णा आढाव,शिव आढाव,संजय भालेराव,निखिल भालेराव,प्रदीप धोंडगे,संतोष देवरे,आदित्य देवरे,श्रीपाद मैड,प्रसिद्ध गायक राहुल शिंदे,संकेत भोसले,आकाश दळवी,दीपक गडकरी,योगेश सोनजे यांसह ओझर परिसरातील विविध क्षेत्रातील मान्यवर, भाविक तसेच आश्रम सल्लागार समिती,आश्रम नियोजन समिती सदस्य व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सत्संग,महाप्रसाद व महाआरतीने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.यावेळी जगदगुरु स्वामी शांतिगिरीजी महाराज यांनी निर्माण केलेल्या देवभूमी जनशांती धाम येथे देव दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली.





Post a Comment
0 Comments