कमलपूर येथील भाऊसाहेब कणसे यांची महाराष्ट्र नाभिक महामंडळातर्फे श्रीरामपूर तालुका उपाध्यक्षपदी नियुक्ती...
श्रीरामपूर/ प्रतिनिधी:- रवींद्र पवार
श्रीरामपूर तालुक्यातील कमलपुर या छोट्याशा गावात शून्यातून विश्व निर्माण करणारे अध्यात्मिक सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रात अग्रेसर असणारे भाऊसाहेब कणसे यांची महाराष्ट्र नाभिक महामंडळ श्रीरामपूर तालुका उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली भाऊसाहेब कणसे यांचे जीवन चरित्र जर बघितले तर संत सेना महाराजांसारखे आहे उच्च विचार साधे राहणीमान श्रीरामपूर तालुक्यात विश्व हिंदू परिषद तालुका कार्यवाह म्हणून देखील त्यांनी काम केलेले आहे.
श्रीरामपूर तालुका तसेच वैजापूर तालुक्यातील देखील त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.भाऊसाहेब कणसे यांच्या पाठीशी साधू संतांचे फार मोठे आशीर्वाद असून आध्यात्मिक क्षेत्रात गोदातीरी रामेश्वर देवगाव शनी होणारा योगीराज सद्गुरू गंगागिरीजी महाराज अखंड हरिनाम सप्ताह वर्षे 178 वे यात देखील भाऊसाहेब कणसे यांचे मोलाचे योगदान राहणार आहे भाऊसाहेब कणसे यांच्या नियुक्तीमुळे त्यांच्यावर नितांत प्रेम करणारे मित्र आप्तेष्ट नातेवाईक मित्रमंडळी यांच्यामध्ये एक उत्साहाचे व आनंदी वातावरण आहे सप्त कृषीच्या वतीने भाऊसाहेब कणसे यांचा शाल पुष्पहार व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला व त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.




Post a Comment
0 Comments