Type Here to Get Search Results !

मुरकुटे यांच्या प्रवेशाने श्रीरामपूरात पक्ष अधिक बळकट-उपमुख्यमंत्री शिंदे मा.आ.भानुदास मुरकुटे यांचा शिवसेना पक्षात प्रवेश...

 मुरकुटे यांच्या प्रवेशाने श्रीरामपूरात पक्ष अधिक बळकट-उपमुख्यमंत्री शिंदे मा.आ.भानुदास मुरकुटे यांचा शिवसेना पक्षात प्रवेश...

श्रीरामपूर (प्रतिनिधी)-

        शिवसेना ही स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी उभारलेली चळवळ आहे. मा. आ. भानुदास मुरकुटे व त्यांच्या समर्थकांचा पक्षात प्रवेश हा पक्षाच्या विचारधारेत रुजलेल्या निष्ठावान नेतृत्वाची भर घालणारा ठरणार आहे. यामुळे पक्षाचे बळ श्रीरामपूर तालुक्यात अधिक वाढेल, असे मत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले.

           राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेऊन आणि त्यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत राहण्याचा संकल्प माजी आमदार भानुदास मुरकुटे आणि अशोकचे संचालक निरज मुरकुटे यांनी व्यक्त करत आपल्या समर्थक कार्यकर्त्यांसह शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश केला. ठाणे येथील आनंद आश्रम येथे हा पक्षप्रवेश सोहळा संपन्न झाला. यावेळी शिंदे यांनी मुरकुटे व त्यांच्या समर्थकांचे पक्षात स्वागत केले.याप्रसंगी माजी उपनगराध्य संजय छललारे यांनीही ठाकरे यांच्या शिवसेनेतुन शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला.यावेळी मा खा सदाशिव लोखंडे, मा आ भाऊसाहेब कांबळे आदींसह अनेक जण उपस्थित होते.

           मी बाळासाहेब ठाकरे यांचे विचार मानणारा आहे. शिवसेना हा फक्त पक्ष नसून जनतेशी नाळ जोडलेली एक चळवळ आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही ग्रामीण भागाचा विकास आणि सामान्य जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी शिवसेनेसोबत खंबीरपणे उभे राहू, असे मत मा आ भानुदास मुरकुटे यांनी व्यक्त केले.

       दरम्यान मुरकुटे यांच्या शिवसेनेतील प्रवेशाने श्रीरामपूर तालुक्यात शिवसेना पक्षाची ताकद वाढणार असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर याचा किती परिणाम होतो या उत्सुकता श्रीरामपूरकरांत आहे.

Post a Comment

0 Comments