राष्ट्रीय श्रीराम संघाचे अध्यक्ष सागर बेग यांना बारामती येथे हिंदू धर्मरक्षक पुरस्काराने गौरव...
बारामती/प्रतिनिधी
पुणे जिल्ह्यातील बारामती,इंदापूर या पुरोगामी विचारांचा पगडा असलेल्या तालुक्यांमध्ये विधर्मी जिहाद्यांची ठासून पुरोगाम्यांच्या मनात हिंदुत्व जागवण्याचे पुण्यकार्य करणाऱ्या राष्ट्रीय श्रीराम संघाचे अध्यक्ष सागर बेग यांना बारामती हिंदू धर्मरक्षक पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
आषाढी एकादशी निमित्ताने बारामती येथे झालेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती समितीच्या वतीने अहिल्यादेवी होळकर यांचा त्रिशताब्दी जयंती कार्यक्रम बारामती नगरपरिषदे समोरील शारदा प्रांगणात मोठ्या थाटात संपन्न झाला.बारामती,भिगवण आणि इंदापूर तालुक्यातून असंख्य धनगर समाज बांधव याप्रसंगी मोठ्यासंख्येने उपस्थित होते.
ग्रामविकास व पंचायतराज मंत्री मा.ना.जयकुमार गोरे यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण धर्मरक्षक सागर बेग यांना करण्यात आले.पुण्यश्लोक अहिल्यादेवींची सुबक मूर्ती देऊन सागर बेग यांना यावेळी गौरवण्यात आले.याप्रसंगी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचे भाषण झाले.तर इतर नियोजित कार्यक्रमामुळे जत विधानसभेचे आमदार व धनगर समाजाचा बुलंद आवाज गोपीचंद पडळकर यांना या कार्यक्रमास उपस्थित राहता आले नाही.



Post a Comment
0 Comments