Type Here to Get Search Results !

जय बाबाजी परिवाराच्या वतीने वेरुळ येथे गुरुपौर्णिमा सोहळा...

 जय बाबाजी  परिवाराच्या वतीने वेरुळ येथे  गुरुपौर्णिमा सोहळा... 


विद्यार्थी संस्कार शिबिराची होणार सांगता.
सामूहिक पाद्य पूजन सोहळ्याचे आयोजन..


प्रतिनिधी/ वेरुळ :- अमर आढाव

         अध्यात्मिक उन्नती ते राष्ट्र कल्याण अशी वाटचाल करणाऱ्या जय बाबाजी भक्त परिवाराच्या वतीने निष्काम कर्मयोगी जगदगुरु जनार्दन स्वामी महाराजांच्या परंपरेनुसार अनंत विभूषित जगदगुरु स्वामी शांतीगिरीजी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत पुण्यभूमी श्रीक्षेत्र वेरुळ येथे १० जुलै रोजी पहाटे ब्रम्हमुहूर्तापासून  गुरुपौर्णिमा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान  येथे गेल्या आठवड्या भरापासून आयोजित  विद्यार्थी संस्कार शिबिराची सांगता देखील यावेळी होणार आहे. भक्त परिवाराच्या १०८ आश्रमातील जगदगुरु बाबाजींच्या चरण पादुकांचे सामूहिक पूजन ब्रह्मवृंदांच्या मंत्रघोषात यावेळी होणार आहे.

          कठोर तपस्वी निष्काम कर्मयोगी शिवयोगी जगदगुरु जनार्दन स्वामी (मौनगिरीजी) महाराज यांच्या श्री क्षेत्र वेरुळ येथील आश्रमात उत्तराधिकारी अनंत विभूषित जगदगुरु स्वामी शांतिगिरीजी महाराज यांच्या प्रेरणेने व प्रमुख उपस्थितीत  वार्षिक गुरुपौर्णिमा महोत्सव गेल्या आठवड्या भरापासून सुरू आहे.या सोहळ्या दरम्यान विद्यार्थी उपनयन संस्कार,विशेष व्याख्यान,हस्त लिखित नामजप,विद्यार्थी संस्कार शिबिर,रोज पहाटे ब्रह्म मुहूर्तावर पहाटे ५ वाजता नित्य नियम विधी, ध्यान,प्राणायाम,सत्संग,महाआरती,रोज चार वेळा विधी पाठ यांसह भरगच्च कार्यक्रम संपन्न झाले. या भव्य दिव्य सोहळ्याची सांगता १० जुलै रोजी गुरुपौर्णिमेच्या पर्वकालावर  होणार आहे.जगदगुरु शांतिगिरीजी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुपौर्णिमेचा लक्षवेधी सोहळा संपन्न होणार आहे. १० जुलै रोजी  पहाटे ४ वाजता जगदगुरु बाबाजींच्या श्री मूर्तीचे अभिषेक पूजन यावेळी संपन्न होईल. यानंतर पहाटे ४.४५ वाजता नित्य नियम विधी,आरती,सत्संग,भागवत वाचन संपन्न होईल.यानंतर सकाळी ७ ते ८ श्रमदान संपन्न होईल,सकाळी ८.३० ते १०.३० पालखी मिरवणूक,सकाळी १०.३० ते १२ जगदगुरु पाद्य पूजन,दुपारी १२ ते १ मुख्य सत्संग,जगदगुरु शांतीगिरीजी महाराज यांचे विशेष मार्गदर्शन संपन्न होईल.यावेळी जय बाबाजी भक्त परिवाराच्या १०८ आश्रमातील जगदगुरु बाबाजींच्या चरण पादुकांचे सामूहिक पूजन यावेळी संपन्न होणार आहे.





Post a Comment

0 Comments