श्रीरामपूरात २२० के.व्ही. विद्युत केंद्राचा भूमीपूजन सोहळा १३ जुलैला...
श्रीरामपूर/प्रतिनिधी:- रविंद्र पवार
- श्रीरामपूर एमआयडीसीत २२० के.व्ही. क्षमतेच्या विद्युत केंद्राच्या भूमीपूजनाचा समारंभ रविवार दिनांक १३ जुलै २०२५ रोजी सकाळी ९.०० वाजता श्रीरामपूर एमआयडीसी (वेकिज इडस्ट्रीज जवळ) येथे होणार असून हा सोहळा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री व जलसंपदा मंत्री माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. तरी सदरील कार्यक्रमास जास्तीत जास्त संख्याने उपस्थित रहावे अशी माहिती श्रीरामपूर एमआयडीसी इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष बाबासाहेब काळे पाटील यांनी केली आहे.
श्रीरामपूर औद्योगिक , शहर , ग्रामीण व परिसरातील वीज समस्येचा प्रश्न कायमस्वरुपी सुटणार आहे.यासाठी श्रीरामपूर एमआयडीसी इंडस्ट्रीज असोसिएशनकडून गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा उर्जा मंत्री नामदार माननीय देवेंद्रजी फडणवीस ,उद्योगमंत्री मंत्री नामदार माननीय उदय सामंत व अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री व जलसंपदा मंत्री माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांचे मोलाचे सहकार्य मिळाले आहे असे काळे पाटील यांनी सांगितले.
केंद्रामुळे श्रीरामपूर औदोगिक ,शहर,ग्रामणी व आसपासच्या भागाला अखंडीत व स्थिर वीजपुरवठा होणार असल्याने औद्योगिक , व्यापारी व कृषी क्षेत्राच्या प्रगतीला चालना मिळेल. त्यामुळे समाधानाचे वातावरण सर्वस्तरातून दिसून येत आहे. तरी सदरील कार्यक्रमास जास्तीत जास्त संख्यांनी उपस्थित रहावे अशी विनंती श्रीरामपूर एमआयडीसी इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष बाबासाहेब काळे पाटील यांनी केली आहे.


Post a Comment
0 Comments