Type Here to Get Search Results !

शिवभक्ती केल्या शिवाय मनुष्य जीवनाचा उद्धार नाही श्री बाबा शास्त्री खंडाळकर यांचे प्रतिपादन..

 शिवभक्ती केल्या शिवाय मनुष्य जीवनाचा उद्धार नाही श्री बाबा शास्त्री खंडाळकर यांचे प्रतिपादन..

ओझर : अमर आढाव

     पत्रम्-फलम्-पुष्पम्-तोयम् अशा अल्पशा पूजेने देखील भगवान शिव प्रसन्न होतात.अत्यंत दयाळू आणि भक्तवत्सल भगवान भोलानाथ आहेत. शिवभक्ती केल्याने आपणच काय आपल्या पितरांचा देखील उद्धार होऊ शकतो.मनुष्य जीवन सार्थकी करायचे असेल तर शिवभक्ती  करणे आवश्यक आहे असे प्रतिपादन  शिव महापुराण कथाकार श्री बाबा शास्त्री महाराज खंडाळकर यांनी केले.

       येथील शिवबा ट्रेकर्ट्सचे सदस्य महेंद्र सुरेश चौधरी यांच्या वतीने अवघ्या काही दिवसात स्वखर्चातून शिव मंदिराचे  निर्माण करण्यात आले.छत्रपती शिवाजी नगर परिसरात शिवलिंग स्थापन निमित्त आयोजित शिव महापुराण कथे प्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना श्रद्धेय श्री बाबा शास्त्री महाराज खंडाळकर बोलत होते.ते पुढे म्हणाले की, दुर्लभ असलेला मनुष्य देह आपल्याला मिळाला आहे.हे आपले सर्वात मोठे भाग्य आहे.भक्तीचा आनंद केवळ मनुष्य देहातच मिळू शकतो. आपल्या बरोबरच आपल्या पितरांचाही उद्धार  करण्यासाठी प्रत्येकाने शिवभक्ती करावी.' शिव-शिव अक्षरे दोन जो वदे रात्रंदिन,धन्य तयाचा संसार'...या प्रमाणे भगवान शिवाच्या नामाचा जप करा. सतत पुण्यकर्म करत रहा, कोणाच्या हिस्याचे घेऊ नका.दरिद्रता येईल.हे सुदामाचे उदाहरण देऊन स्पष्ट केले.कोणाचा तळतळाट घेऊ नका. महादेवाच्या मंदिरात दिवा लावण्याचे व बिल्वपत्र वाहण्याचे मोठे महत्त्व आहे. देवाला कबूल केलेला संकल्प त्वरित पूर्ण करत जा.  केलेल्या संकल्पाची देव वेळोवेळी आठवणही करून देत असतो मात्र याकडे बारकाईने लक्ष देणे गरजेचे आहे.असेही शेवटी श्री बाबा शास्त्री महाराज खंडाळकर  यांनी सांगितले.कार्यक्रम यशस्वितेसाठी वैष्णवी कन्स्ट्रक्शन  व शिवबा ट्रेकर्सचे सदस्य परिश्रम घेत आहेत.



Post a Comment

0 Comments