नाशिक:- जोतिर्लिंगा पैकी एक असलेल्या पवित्र श्रीक्षेत्र त्र्यंबेकश्वर येथे आमदार हिरामणजी खोसकर व धर्मरक्षक सागर बेग यांनी असंख्य हिंदू धर्म प्रेमींच्या उपस्थितीत त्र्यंबकेश्वर महादेवाला अभिषेक घालून हिंदू राष्ट्राची मागणी केली...
जोतिर्लिंगा पैकी एक असलेल्या पवित्र श्रीक्षेत्र त्र्यंबेकश्वर येथे इगतपुरीचे आमदार हिरामणजी खोसकर व धर्मरक्षक सागर बेग यांनी असंख्य हिंदू धर्म प्रेमींच्या उपस्थितीत पवित्र श्रावण महिन्यातील चौथ्या सोमवारी त्र्यंबकेश्वर महादेवाला अभिषेक घालून हिंदू राष्ट्राची मागणी केली. ब्रम्हगिरी पर्वताच्या पायथ्याशी व पावन गोदावरी नदीच्या उगमस्थानी असलेल्या पेशवेकालीन पवित्र श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे श्रावण महिन्यात संपूर्ण भारतातून भाविकांची गर्दी असते.श्रावण महिन्यातील पवित्र अशा चौथ्या सोमवारचे औचित्य साधून इगतपुरी, त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदार संघांचे हिंदुत्ववादी आमदार हिरामणजी खोसकर यांच्या मतदार संघातील हिंदू धर्म बांधवांनी हा योग घडवून आणला. आमदार खोसकर यांच्या आमंत्रणाला मान देऊन धर्मरक्षक सागर बेग यांनी राष्ट्रीय श्रीराम संघाच्या असंख्य कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना घेऊन त्र्यंबकेश्वरला आमदार खोसकर यांच्या उपस्थितीत महादेवाला अभिषेक घालून भारताला लवकर हिंदू राष्ट्र कारण्याचे साकडे घातले.
याप्रसंगी धर्मरक्षक सागर बेग यांचा त्र्यंबकेश्वर मंदिराचे विश्वस्त पुरुषोत्तम भाऊ कडलक यांनी शाल श्रीफल देऊन सत्कार केला तर आमदार खोसकर यांनी त्र्यंबकेश्वर महादेवाची प्रतिमा भेट देऊन सागर बेग यांचा इगतपुरी त्र्यंबकेश्वर मतदार संघाच्या वतीने सन्मान केला.यावेळी संकेत भाऊ चव्हाण,लकी गोवर्धने,गणेश पठारे,तुषार थेटे, राष्ट्रीय श्रीराम संघांचे राहाता तालुकाध्यक्ष मदन भाऊ मोकाटे यांच्यासह राष्ट्रीय श्रीराम संघांचे असंख्य कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.



Post a Comment
0 Comments