Type Here to Get Search Results !

“१५ वर्षांनी पुन्हा भेटले वर्गमित्र — शाळेचा प्रत्येक कोपरा पुन्हा बोलू लागला!”



     १५ वर्षांनी पुन्हा भेटले वर्गमित्र!काटे पिंपळगाव येथे लोकनेते साहेबराव पाटील डोणगावकर विद्यालयाच्या २००९-१० च्या माजी विद्यार्थ्यांचा भावनिक स्नेहमेळावा उत्साहात संपन्न! 

गंगापूर (प्रतिनिधी) - मयुर फिंपाळे

          रविवार, दि. २६ ऑक्टोबर २०२५ रोजी गंगापूर तालुक्यातील काटे पिंपळगाव येथील लोकनेते साहेबराव पाटील डोणगावकर माध्यमिक विद्यालयात वर्ष २००९-२०१० च्या माजी विद्यार्थ्यांचा भव्य व भावनिक स्नेहमेळावा उत्साहात पार पडला. तब्बल १५ वर्षांनंतर सर्व वर्गमित्र एकत्र आल्याने शाळेचा परिसर आनंद, हशा आणि आठवणींनी भारून गेला.

     कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक आदरणीय बापूसाहेब पानकडे सर उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून कराळे सर, साळुंखे सर, हिवाळे सर, तारू सर, बाराहाते सर, सोनवणे मॅडम, पुंड सर, वाहुळ सर, शेळके सर, करवरे सर या मान्यवर शिक्षकवृंदांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.

   


 

       कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने झाली. त्यानंतर सर्व माजी विद्यार्थ्यांनी मानाचा फेटा परिधान करून एकमेकांना भेटत जुन्या आठवणींना उजाळा दिला. विविध विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना शालेय जीवनातील आनंद, शिस्त आणि त्या काळातील गमतीजमतींच्या आठवणींनी वातावरण भारावून गेले.कार्यक्रमादरम्यान हास्य आणि आनंदाच्या लहरींमध्ये भावनांचे क्षणही अनुभवले गेले. “जुन्या शाळेच्या आठवणींना पुन्हा स्पर्श करताना डोळ्यांत पाणी आणि चेहऱ्यावर हसू — हीच खरी स्नेहमेळाव्याची ओळख,” असा एकसुरी भाव सर्वांच्या मनात दाटून आला.या स्नेहमेळाव्याचे प्रमुख आयोजक गणेश फिंपाळे, सागर सुराशे, योगेश शिंदे, गीतांजली गोरे, मोहीनी सोनवणे, यशोधरा सोनवणे हे होते. तर आभार प्रदर्शन गणेश घोगरे यांनी मानले.या कार्यक्रमात ज्ञानेश्वर फिंपाळे, मनोज फिंपाळे, सचिन राऊत, योगेश राऊत, विलास तांबे, सागर सुराशे, योगेश जगताप, स्वप्नील पोटे, अशोक राऊत, कृष्णा धोत्रे, भरत काळे, प्रशांत चव्हाण, अमोल त्रिभुवन, समाधान जगताप, पूजा जोशी, जया बुट्टे, ज्योती सोनवणे, कोमल फिंपाळे, अश्विनी थोरात, साधना फिंपाळे, उषा धोत्रे, सविता शिंदे, भारती धोत्रे आदींची उपस्थिती लक्षणीय ठरली.

         कार्यक्रमानंतर सर्वांनी एकत्र भोजन घेत जुने दिवस आठवले. सर्वांच्या चेहऱ्यावर समाधान, आपुलकी आणि आनंदाचा झळाळता भाव दिसत होता.

📸 “आठवणींचा मेळावा, भावनांचा सोहळा — काटे पिंपळगावमध्ये वर्गमित्रांनी पुन्हा लिहिली शालेय जीवनाची सुंदर आठवण!”





Post a Comment

0 Comments