Type Here to Get Search Results !

‘पहिली बेटी धनाची पेटी!’चेंडूफळमध्ये नातीच्या जन्माचा उत्सव भक्तिभावाने साजरा; गावात गाजला संस्कारांचा सोहळा!

 

चेंडूफळ येथे मुलीच्या जन्माचा वेगळ्या पद्धतीने उत्सव — आजोबा व मामांकडून भजन, अन्नदान!

वैजापूर प्रतिनिधी :- रवींद्र पवार

      वैजापूर तालुक्यातील चेंडूफळ येथे आनंदमय वातावरण पाहायला मिळाले. येथील रमेश दत्तात्रय पवार यांच्या कन्येला कन्यारत्न प्राप्त झाल्याने कुटुंबीयांनी हा आनंद वेगळ्या पद्धतीने साजरा केला.नातीचा जन्मोत्सव आजोबा तसेच मामांकडून भजन व अन्नदान कार्यक्रम आयोजित करून साजरा करण्यात आला. या उपक्रमातून समाजासमोर “बेटी बचाव, बेटी पढाव” तसेच “पहिली बेटी धनाची पेटी” या संदेशाचा सुंदर प्रसार झाला.

      या कुटुंबातील ब्रह्मलीन गुरुवर्य नारायणगिरी महाराज यांचे शिष्य व भक्त ह. भ. प. दत्तात्रय पाटील पवार यांच्या संस्कारांचा आदर्श घेत पवार कुटुंबीयांनी समाजासमोर एक संस्कारी उदाहरण ठेवले आहे.कार्यक्रमास देवगावशनी,बाजाठाण, चेंडूफळ येथील भजनी मंडळ, साऊंड सिस्टिम धारक संजय बनसोडे तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. गावातील तरुण मंडळांनी अन्नदान व्यवस्थापनात मोलाचे योगदान दिले.कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडल्याबद्दल मुलीचे मामा विशाल पवार आणि हनुमंत पवार यांनी उपस्थितांचे आभार मानले.



Post a Comment

0 Comments