Type Here to Get Search Results !

सोयाबीन चोर टोळीचा पर्दाफाश - अपर पोलीस अधीक्षकांच्या नेतृत्वाखाली तपास पथकाची धडाकेबाज कारवाई...

 

सोयाबीन चोर टोळीचा पर्दाफाश - अपर पोलीस अधीक्षकांच्या नेतृत्वाखाली तपास पथकाची धडाकेबाज कारवाई...

श्रीरामपूर/ प्रतिनिधी

        या प्रकरणी हकीगत अशी की, यातील फिर्यादी श्री. गोरक्षनाथ भिमराज ढवळे, रा. नायगाव, ता. श्रीरामपुर यांनी त्यांचे शेतातील पत्र्याचे शेड मध्ये ठेवलेले एकुण १५ गोण्या अंदाजे ११ क्विंटल सोयाबीन, एकुण ४५,०००/- रु.किं.चे हे दि.०६/११/२०२५ रोजी १६.०० ते दि.०८/११/२०२५ रोजी १६.०० वा. चे दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरट्याने लबाडीचे इरादयाने शेडमध्ये ठेवलेल्या सोयाबीनच्या गोण्या स्वतःचे फायदयाकरीता चोरुन नेल्या होत्या म्हणुन श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशन येथे दि.०८/११/२०२५ रोजी गु.र.नं. ४८७/२०२५ भा. न्या. सं. कलम ३०३ (२) प्रमाणे गुन्हा नोंद केला आहे.श्री. सोमनाथ वाघचौरे, अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपुर यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरुन सदरचा गुन्हा हा आरोपी नामे सचिन जगन्नाथ मोरे, रा. नायगाव, ता.श्रीरामपुर याने त्याचे साथीदारांसह केला असल्याचे समजल्याने त्यास पकडण्यासाठी अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर कार्यालयातील पोलीस अमंलदार यांनी सापळा रचुन आरोपी १) सचिन जगन्नाथ मोरे, वय ३०, रा. नायगाव, ता. श्रीरामपूर जि. अहिल्यानगर यास ताब्यात घेवुन त्याचेकडे गुन्हयाचे अनुषंगाने विचारपुस केली असता त्याने गुन्हा केल्याचे कबुल केले आहे. त्यास त्याचे साथीदाराचे नाव विचारले असता त्यांने त्यांची नावे २) हरीदास अर्जुन निकम, वय १९ वर्ष, रा. नायगाव, ता. श्रीरामपूर जि. अहिल्यानगर ३) शुभम जालींदर मोरे, वय १९ वर्ष, रा. नायगाव, ता. श्रीरामपूर जि. अहिल्यानगर ४) तुषार अनिल सदाफुले, वय २३ वर्ष, रा. नायगाव, ता. श्रीरामपूर जि. अहिल्यानगर ५) विशाल अशोक गायकवाड, वय २१ वर्ष, रा. नायगाव, ता. श्रीरामपूर जि. अहिल्यानगर असे सांगीतले.

   त्यावरुन लागलीच उर्वरीत आरोपी यांना पकडण्यासाठी तपास पथकाने सापळा रचुन वरील नमुद आरोपींना ताब्यात घेतले असता नमुद आरोपी यांनी एकत्र येवुन सदरचा गुन्हा केल्याचे कबुल केले आहे. त्यापैकी काही आरोपी हे फिर्यादीचे घराशेजारी राहणारे असुन त्यांनी प्रथमतः साठविलेल्या सोयाबीनची पाहणी केली नंतर रात्री उशीरा आरोपी तुषार अनिल सदाफुले याचे पिकअप वाहन घेवुन येवुन शेडमध्ये ठेवण्यात आलेल्या सोयाबीनच्या गोण्या चोरुन नेलेबाबत सांगीतले आहे. सदर गुन्हयातील चोरीचा माल खरेदी करणाऱ्या व्यापाराचा तपास पथक कसोशीने शोध घेत असुन पुढील तपास पोहेकॉ/ परेश आगलावे, श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशन हे करत आहेत.
सदरची कारवाई ही श्री. सोमनाथ घार्गे साो, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर, श्री.सोमनाथ वाघचौरे, अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपुर, श्री. जयदत्त भवर, उपविभागीय पोलीस अधिकारी, श्रीरामपूर यांचे मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपुर कार्यालयातील पो.स.ई. चारुदत्त खोंडे, पो.हे.कॉ. दादासाहेब लोढे, पो.ना. संदीप दरंदले, पो.कॉ. राजेंद्र बिरदवडे, पो.कॉ. सहदेव चव्हाण, पो.कॉ. अशोक गाढे, व मोबाईल सेलचे पो.हे.कॉ. संतोष दरेकर, पो.हे.कॉ सचिन धनाड, पो.ना.रामेश्वर वेताळ तसेच श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशनचे पो.नि. अरुण धनवडे, पो.हे.कॉ. परेश आगलावे यांनी केली आहे.



Post a Comment

0 Comments