Type Here to Get Search Results !

इंडियन लँगवेजेस न्यूजपेपर्स असोसिएशनच्या निमंत्रित सदस्यपदी प्रकाश कुलथे यांची निवड...


          इंडियन लँगवेजेस न्यूजपेपर्स असोसिएशन, (ILNA) इलनाच्या निमंत्रित सदस्यपदी श्रीरामपूरचे पत्रकार प्रकाश कुलथे यांची निवड करण्यात आली आहे.

         इंडियन लँगवेजेस न्यूजपेपर्स असोसिएशन, (ILNA) इलनाची ८१ वी वार्षिक आमसभा देशातील वृत्तपत्र मालक संपादकांच्या उपस्थितीमधे  नवी दिल्लीतील नविन महाराष्ट्र सदन येथे इलनाचे माजी अध्यक्ष  तथा सोशल मिडिया असो. (SMA) चे राष्ट्रीय अध्यक्ष  सुनील डांग, यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. याप्रसंगी विशेष अतिथी म्हणून निमंत्रित केलेले केन्द्रीय आयुष मंत्री (स्वतंत्र प्रभार) प्रतापराव जाधव, इलनाचे पूर्व उपाध्यक्ष तथा सन्मार्ग मीडिया समूहाचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक विवेक गुप्ता, भूषण जैन व उत्तर प्रदेश,डॉ. ललित भारद्वाज, केरल,पीजी सुरेश बाबू, दिल्ली, विशाल रावत, एनसिआर, अशोक कौशिक, लखनऊ अशोक नवरतन हे पाच प्रदेशाध्यक्ष उपस्थित होते.

         श्री प्रकाश पोहरे यांनी  सात कार्यकारी सदस्य निवड जाहीर केली यामध्ये राममोहन रघुवंशी, भोपाल (मप्र), कृष्णा शेवडीकर, नांदेड (महा) प्रकाश कुलथे, श्रीरामपूर, (महा) अशोक कौशिक दिल्ली, अशोक नवरत्न, लखनव, शरद वानखेड़े, अकोला (महा), सुरेश बाबू (केरळ), सुरेंद्रकुमार शर्मा, दिल्ली आदींचा समावेश आहे. 

      प्रकाश कुलथे हे महाराष्ट्र संपादक परिषदेचे कार्याध्यक्ष असून वृत्तपत्र व प्रसार माध्यम राज्य आधीस्वीकृती समितीचे सदस्य आहेत, शंकरराव चव्हाण पत्रकार कल्याण निधीचे सदस्य श्रीरामपूर पत्रकार संघाचे सचिव श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर लाड सुवर्णकार संस्थेचे उपाध्यक्ष महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा श्रीरामपूरचे कार्याध्यक्ष अशा विविध संघटनांवर कार्यरत आहेत त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे



Post a Comment

0 Comments