“श्रीरामपुरात गोमांस कत्तलखान्यावर धडक छापा; अपर पोलिस अधीक्षकांच्या पथकाची मोठी कारवाई!”
दिनांक 23/11/2025 रोजी सकाळी मा. श्री सोमनाथ वाघचौरे, अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपुर यांना मिळालेल्या गोपनीय माहीती प्रमाणे श्रीरामपुर शहरातील वार्ड नं.02 येथील मक्का मस्जिद जवळ दालवाली चाल येथे गोवंशीय जनावराची कत्तल करत आहेत, अशी खात्रीशीर माहीती मिळाल्याने अपर पोलीस अधीक्षक कार्यालयातील पोलीस अंमलदार पो.हे.कॉ.दादासाहेब लोढे, पो.ना.संदीप दरंदले, पो.कॉ राजेंद्र बिरदवडे, पो.कॉ. सहदेव चव्हाण, पो.कॉ. अशोक गाढे यांना सुचना देवुन पोलीस निरीक्षक श्रीरामपुर शहर यांची मदत घेवुन कारवाई करणेबाबत सुचना देवुन पथकास रवाना केले होते.
अपर पोलीस अधीक्षक कार्यालयातील अंमलदार यांनी दिनांक 23/11/2025 रोजी श्रीरामपुर शहर पोलीस स्टेशन येथे येवुन पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांना गोपनीय माहितीदाराने दिलेल्या खबरीबाबत माहीती दिली. त्यानंतर पो. नि. नितीन देशमुख यांनी सांगितल्याप्रमाणे पो.हे.कॉ राजु जिभवन व पो.ना अडांगळे यांनी दोन पंच व पशुवैद्याकीय अधिकारी यांना बोलावुन घेवुन, श्रीरामपुर शहरातील वार्ड नं.02 येथील मक्का मस्जिद जवळ दालवाली चाल येथे गोवंशीय जनावराची कत्तल करत असलेल्या खबरीबाबत माहीती देवुन, सदर ठीकाणी कारवाई करणे जाणे असलेबाबत कळवुन, नमुद पथक बनवुन छापा कारवाईकरीता रवाना झाले.
नमुद पथकाने बातमीतील श्रीरामपुर शहरातील वार्ड नं.02 येथील मक्का मस्जिद जवळ दालवाली चाल श्रीरामपुर येथे जावुन खाजगी वाहने बाजुला उभी करुन पायी चालत जावुन खाजी केली असता एक इसम घराच्या आडोशाला पञ्याच्या शेड मध्ये गोवंशीय जनावराची कत्तल केलेले मास कापत असताना दिसला नमुद पथक व पंचांची खात्री झाली असता छापा टाकुन सदर इसमात ताब्यात घेवुन त्याचे नाव, पत्ता विचारला असता त्याने त्याचे नाव हारुन सुलेमान कुरेशी वय 38 वर्षे रा. बिफ मार्केट परीसर अमनचौक वार्ड नं.02 श्रीरामपुर जि. अहिल्यानगर असे असल्याचे सांगितले. सदर ठीकाणी असलेल्या पत्र्याच्या शेड मध्ये पाहणी केली असता तेथे खालील वर्णनाचे गोवंश जनावराचे मास व साहित्य मिळुन आले. 90,000 रु कि.चे 450 किलो गोवंश जातीच्या जनावराचे मांस प्रति 200 रु कि.ग्रॅ.प्रमाणे मिळुन आलेले किं.अं. 1000 रु. किं.चा एक धारधार सुरा व लोखंडी वजन काटा जु.वा.किं.अं. असे एकुण 91000 /- एकुण रु.चे गोमास त्यातील पशुधन विकास अधिकारी, श्रीरामपुर श्री अनिल भांड यांनी मिळालेले मास गोवंशीय मासामधुन सॅम्पल घेवुन ते गोवंशीय अगर म्हैसवर्गीय आहे कसे याचे परीक्षण होणे करीता राखुन ठेवुन पंचासमक्ष सिलबंद केला आहे. सदर गोमासचा पंचनामा करुन पो.हे.कॉ राजु जिभुवन यांनी जागीच ताब्यात घेवुन सविस्तर पंचनामा केला आहे.
श्रीरामपुर शहरातील वार्ड नं.02 येथे मक्का मस्जिद जवळ, दालवाली चाल येथील गोवंशीय जनावरांची कत्तल करणारा इसम नामे हारुन सुलेमान कुरेशी वय 38 वर्षे रा.बिफ मार्केट परीसर अमनचौक वार्ड नं.02 श्रीरामपुर जि. अहिल्यानगर हा घराच्या आडोशाला पत्र्याच्या शेड मध्ये गोवंशीय जनावराची कत्तल करताने मिळुन आल्याने त्याचे विरुद्ध पो.कॉ बिरदवडे नेमणुक अपर पोलीस अधीक्षक कार्यालय श्रीरामपुर यांच्या फिर्यादीवरुन महाराष्ट्र प्राणी संरक्षण (सुधारणा) अधिनियम 1995 चे सुधारीत कायदा सन 2015 चे कलम 5, 5(अ), 5(ब), 9 (अ) प्रमाणे फिर्याद देवुन श्रीरामपुर शहर पोलीस स्टेशन गुं.र.नं 1041/2025 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असुन, पुढील तपास पो.हे.कॉ राजु त्रिभुवन नेमणुक श्रीरामपुर शहर पोलीस स्टेशन हे करत आहेत.
सदरची कारवाई ही मा.श्री सोमनाथ घार्गे सो, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर, श्री सोमनाथ वाघचौरे, अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपुर, श्री जयदत्त भवर, उपविभागीय पोलीस अधिकारी, श्रीरामपुर यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपुर कार्यालयातील पोसई चारुदत्त खोंडे, पो.हे.कॉ. दादासाहेब लोढे, पो.ना.संदीप दरंदले, पो.कॉ राजेंद्र बिरदवडे, पो.कॉ. सहदेव चव्हाण, पो.कॉ. अशोक गाढे, मोबाईस सेलचे पो.हे.कॉ सचिन धनाड, पो.ना रामेश्वर वेताळ तसेच श्रीरामपुर शहर पोलीस स्टेशनचे पो.हे.कॉ राजु ञिभुवन व पो.ना अडांगळे यांनी केली आहे.



Post a Comment
0 Comments