श्रीरामपूर (प्रतिनिधी मयुर फिंपाळे)
श्रीरामपूर तालुक्यातील माळवाडगाव येथील खानापूर ते उंदीरगाव या महत्त्वाच्या शिवरस्त्याच्या कामाला राज्याचे जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विशेष निधीतून अखेर प्रारंभ झाला आहे. नामदार विखे पाटील यांचे खंदे समर्थक व ज्येष्ठ नेते गिरीधर आसने, भाजपचे तालुकाध्यक्ष बाबासाहेब चिडे, भाऊसाहेब बांद्रे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे या रस्त्याच्या कामाचा आज अधिकृत शुभारंभ करण्यात आला.सदर रस्ता अनेक वर्षांपासून दुर्लक्षित अवस्थेत होता. या परिसरात आसने, दळे व बांद्रे कुटुंबीयांची मोठी वस्ती असून, पावसाळ्याच्या दिवसांत रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था होत असल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. चिखल, खड्डे आणि खराब दळणवळणामुळे शाळकरी मुले, वृद्ध नागरिक तसेच शेतकऱ्यांना ये-जा करणे कठीण झाले होते. शेतमाल वाहतूक तसेच दैनंदिन गरजांसाठी हा रस्ता अत्यंत महत्त्वाचा असूनही अनेक वर्षे त्याकडे दुर्लक्ष झाले होते.
या समस्येची गांभीर्याने दखल घेत ज्येष्ठ नेते गिरीधर आसने यांनी पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे या रस्त्याच्या कामाबाबत सातत्याने पाठपुरावा केला. नागरिकांच्या अडचणी समजून घेत नामदार विखे पाटील यांनी या प्रश्नाची तात्काळ दखल घेत सदर रस्त्यासाठी निधी मंजूर केला आणि कोणताही विलंब न करता रस्त्याच्या कामास सुरुवात केली.
या रस्त्याच्या कामामुळे खानापूर, उंदीरगाव, माळवाडगांव, माळेवाडी तसेच परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून दळणवळण अधिक सुलभ होणार आहे. विशेषतः पावसाळ्यात होणारा त्रास कमी होऊन नागरिकांच्या जीवनमानात सुधारणा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
सदर रस्त्याचे काम सुरू केल्याबद्दल निवृत्ती आसने, सोपान आसने, नानासाहेब आसने, गणेश आसने, जनार्धन दळे आदी ग्रामस्थांनी राज्याचे जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील, ज्येष्ठ नेते गिरीधर आसने, भाजपचे तालुकाध्यक्ष बाबासाहेब चिडे, भाऊसाहेब बांद्रे यांचे आभार व्यक्त केले आहेत. यावेळी विजय सिताराम आसने, पाराजी दळे, दत्तात्रय दळे, भागचंद दळे, कारभारी दळे, डॉ. दादासाहेब आदिक, आण्णासाहेब आसने, शिवाजी आसने, नानासाहेब आसने, मच्छिन्द्र दळे, सतीश आसने, प्रसाद जगरूपे, अमोल मोरे, अविनाश दळे, अशोक दळे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
“तालुक्यातील अनेक वर्षांपासून दुर्लक्षित असलेल्या शिवरस्त्यांच्या कामांना लवकरच राज्याचे जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून प्रारंभ होणार असून ग्रामीण भागातील दळणवळण सुलभ करण्यासाठी प्राधान्याने कामे केली जातील,” अशी माहिती ज्येष्ठ नेते गिरीधर आसने यांनी दिली.



Post a Comment
0 Comments