Type Here to Get Search Results !

बाजारठाणात भक्तीचा महासागर! श्री रामलल्ला प्रकट दिनानिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाची उद्या सुरुवात...

बाजारठाणात भक्तीचा महासागर! श्री रामलल्ला प्रकट दिनानिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाची उद्या सुरुवात...

प्रतिनिधी : मयूर फिंपाळे

           वैजापूर तालुक्यातील बाजारठाण येथील श्री रामदरबार आश्रमात श्री रामलल्ला प्रकट दिन व तपपूर्ती सोहळ्यानिमित्त भव्य अखंड हरिनाम सप्ताह व रससमय कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.हा पवित्र सप्ताह शुक्रवार, दि. २० मार्च २०२६ पासून सुरू होऊन दि. २७ मार्च २०२६ पर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमांनी भक्तिमय वातावरणात पार पडणार आहे. सप्ताहादरम्यान दररोज हरिनाम संकीर्तन, कीर्तन, प्रवचन व भजन  सेवा असणार आहे.

    या सप्ताहात राज्यभरातील नामांतर कीर्तनकार व प्रवचनकार आपली सेवा देणार आहेत. त्यामध्ये ह.भ.प. आप्पा महाराज शास्त्री, स्वामी प्रकाशानंदगिरीजी महाराज, स्वामी विज्ञानानंदगिरीजी महाराज, ह.भ.प. संदीपनजी महाराज, ह.भ.प. दत्तू महाराज, ह.भ.प. कैलास महाराज खंडागळे, ह.भ.प. श्रीहरी महाराज, ह.भ.प. भाऊसाहेब महाराज जोशी आदींचा समावेश आहे.

    सप्ताहाच्या समारोपाच्या दिवशी प्रेममूर्ती महंत हरिरामगिरीजी महाराज यांचे काल्याचे कीर्तन व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून, हजारो भाविकांच्या उपस्थितीत हा सोहळा उत्साहात पार पडणार आहे.

   या धार्मिक सोहळ्यामुळे बाजारठाण परिसरात भक्तीचा उत्सव रंगणार असून, सर्व भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून हरिनाम सप्ताहाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

📍 स्थळ : श्री रामदरबार आश्रम, बाजारठाण, ता. वैजापूर, जि. छत्रपती संभाजीनगर



Post a Comment

0 Comments