Type Here to Get Search Results !

हिंदू धर्मगुरू महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरीजी महाराज यांचा नाशिक येथे "वचननामा" प्रसिद्ध...

 हिंदू धर्मगुरू महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरीजी महाराज यांचा नाशिक येथे "वचननामा" प्रसिद्ध...

 वाचननामा पूजन करतांनी शिवप्रहार प्रमुख माजी PSI श्री सुरजभाई आगे

महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरी महाराज वचननामा प्रकाशित करतानी

नाशिक /प्रतिनिधी

         राजकारणाचे शुद्धीकरण करण्याच्या इराद्याने नाशिक लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या जय बाबाजी परिवाराचे महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरीजी महाराज यांनी काल वचननामा प्रकाशित केला. त्यावेळी त्या वाचननामा पूजन शिवप्रहार प्रमुख माजी PSI श्री सुरज भाई आगे यांच्या हस्ते करण्यात आले . नाशिक शहरात पत्रकार परिषदेच्या माध्यमातून घोषित करण्यात आला.यामध्ये नाशिकच्या विकासाच्या अनेक मुद्रयांचा त्यांनी समावेश केला असून, विशेष म्हणजे निवडून आल्यानंतर खासदारांना असलेले वेतन, भत्ते असे काहीही घेणार नसल्याचे शांतिगिरीजी महाराज यांनी सांगितले.

        नाशिक लोकसभा मतदारसंघाचा प्रचार आता चांगलाच रंगात आला आहे. नाशिकमध्ये चौरंगी लढत होत आहे. शांतिगिरीजी महाराज यांनी माघार घ्यावी म्हणून प्रयत्न झाले. मात्र, राजकारणाच्या शुद्धीकरणासाठी शांतिगिरीजी महाराज यांनी उमेदवारी कायम ठेवत अपक्ष रिंगणात उडी घेतली आहे. काल वचननामा प्रकाशित करताना शांतिगिरीजी महाराज यांनी आपण जे बोलणार तेच करणार. जनतेला खोटी आश्वासने देणार नाहीत, असे सांगितले. नाशिकमध्ये खासदार भवन उभारणार जेणेकरून लोकांना त्यांच्या अडचणी सोडविणे शक्य होईल.

     गोदावरीचे पावित्र्य अबाधित राहण्यासाठी प्रयत्न करणार असून, शेतकऱ्यांसाठी सेंद्रीय खतांचा कारखाना, जनतेचा पैसा जनतेलाच देणार, ड्रग्जमुक्त नाशिक करणार, कुंभमेळा व्यवस्थापन योग्य रित्या करणार, स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न मिळविण्यासाठी प्रयत्न करणार, सध्या पैसे कसे कमवायचे हेच शिकविले जाते. पण संस्कार कोणी शिकवत नाही. त्यामुळे खासदार कसा असावा, हे आपण दाखवून देऊ, असे शांतिगिरी महाराज म्हणाले. यावेळी विष्णू महाराज यांच्यासह जय बाबाजी भक्त परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.





गुरुमाऊली ऑनलाईन सर्विसेस सेतु नवीन तहसील कार्यालय समोर श्रीरामपूर संपर्क:-9021816965,

Post a Comment

0 Comments